Wedding Fighting Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding Fighting Video: कुलरमुळे लग्नात तांडव, वऱ्हाड्यांमध्ये खुर्ची अन् लाथा-बुक्क्यांनी जोरदार हाणामारी

Jhansi Wedding Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका अतरंगी घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. घडलेली ही घटना भारतातील घडलेल्या एका लग्नातील आहे. नेमके काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Cooler fight video viral: लग्नकार्य म्हटलं की आनंद, गोडवा आणि नातेवाईकांचा एकत्रित जल्लोष. मात्र, जर हा आनंदच क्षणात हाणामारीत बदलला, तर? नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका लग्नाच्या कार्यक्रमात केवळ कुलरच्या हवेवरून दोन्ही बाजूंच्या वऱ्हाड्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. ही घटना पाहणाऱ्यांचे डोळे चाट पडावेत अशी होती आणि सध्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमधील एका लहानशा गावात घडली. मे महिन्याचे अखेरचे दिवस आहेत तरी या ठिकाणी लग्नाच्या दिवशी प्रचंड उकाडा होता. हॉलमध्ये फक्त दोनच मोठे कुलर लावले होते. वऱ्हाड्यांचे जेवण सुरू असतानाच एक पक्ष कुलरसमोर बसले होते आणि दुसऱ्या पक्षाला तिथे बसायचं होतं. हवेवरून सुरू झालेलं वादाचं कारण काही क्षणांतच जोरदार भांडणात (Fighting Video) आणि नंतर हाणामारीत परिवर्तित झालं.

हाणामारीचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशस मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो पहिल्यांदा @SachinGuptaUP या एक्स अकाउंटवर पाहिला गेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला नेटकऱ्यांनी लाखोंचे व्ह्यूज आणि लाईक्स मिळवून दिलेले आहेत.

या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं की,''काय रे देवा कारण पाहून हसायला आलं'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''हे फक्त भारतात(India) होऊ शकतं'' तिसऱ्या यूजरनेही म्हटलं की,''सोशल मीडियावर आलं की असंच काहीसं पाहण्यासाठी मिळतं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पडद्यामागं कोण होतं? एकनाथ शिंदे म्हणाले...VIDEO

Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी चुकूनही करु नये 'या' गोष्टी, अन्यथा...

Maratha Reservation: मुंबईत आंदोलनांवर बंदी घालावी; मिलिंद देवरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT