Snake Shocking Video: आजच्या काळात रील्स पाहण्याचं वेड प्रचंड वाढलं आहे. बरेजजण मोबाईलमध्ये इतके गुंग होतात की त्यांना आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचं काहीच भान राहत नाही. अनेकदा त्यांच्यासाठी हीच सवय जीवघेणी ठरते. अलीकडेच एका शेतकऱ्याच्या मांडीवर साप येऊन बसल्याची घटना घडली, तेव्हा तो मोबाईलवर रील्स पाहण्यात मग्न होता. थोडीशी चूक झाली असती तर जीवावर बेतलं असतं.
व्हायरल(Viral) होत असलेल्या या घटनेत, एक शेतकरी काम आवरुन शेतात काही वेळ रील्स पाहत बसला होता. निंवात झाड्याच्या सावली खाली शेतकरी बसलेला होता. मात्र, काही वेळाने मोबाईलवर रिल्स पाहताना त्याच्या मांडीवर भलामोठा साप चढू लागतो. पहिल्यांदा शेतकऱ्याला काही समजले नाही पण, त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या मांडीवर साप चढलेला आहे.
शेतकऱ्याच्या हे लक्षात येताच, स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सापाला(Snake) मागे सारत तेथून शेतकरी पळून जातो. सर्व व्हिडिओ शेतकऱ्याने मोबाईमध्ये कैद केला आहे आणि सोशल मीडियावरही शेअर केला आहे. सुदैवाने, यात शेतकऱ्याला कोणतीही हानी झालेली नाही. मात्र, या घटनेने परत एकदा स्पष्ट होते की, मोबाईलमध्ये गुंग होणं किती धोकादायक ठरते.
ही घटना पुणे जिल्ह्यातील असल्याचे समजते. पण याची पुष्टी होऊ शकलेली नाही. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील punecitylive.news.pune या अकाउंटवर शेअर केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून अनेक मजेशीर आणि हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं की,''हातात मोबाईल असला का भूत जरी जवळ येऊन बसलो तरी कळत नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''वारंवार अशा घटना समोर येत आहेत'' अशा अनेक कमेंटस् आल्या आहेत.
टीप: शेतकऱ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.