Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईकवरुन आला,तोल गेला अन् थेट खड्ड्यात पडला;VIDEO पाहून थरकाप उडेल

Vadodara Road Accident Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये अपघात कसा झाला ते पाहण्यासाठी एकदा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Shocking Accident Video: सध्या गुजरातमधील वडोदरा येथील एक धक्कादायक व्हिडिओ समारे आलेला आहे जो पाहून प्रत्येकजण घाबरुन गेलेला आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात एक वाहन चालक दुचाकीसह पडलेला आहे.या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला एका परिसरातील मोकळा रस्ता दिसत आहे आणि त्यात रस्त्यावर एक मोठा खड्डा खोदला आहे.काहीवेळाने त्याच रस्त्यावरुन एक दुचाकी चालक बाईकवरुन जात असतो मात्र त्याच खड्ड्याच्या नजीकहून जात असताना त्याचा त्यात खड्ड्यामुळे तोल जाऊन खोल खड्ड्यात पडतो.त्यानंतर त्या परिसारातील असलेल्या नागरिकांना संपूर्ण घटना पाहून तिथे धाव घेतली आणि त्याला त्या खड्ड्यातुन बाहेर काढण्यात येते.सर्व घटनाही जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेली घटना गुजरातमधील वडोदरामधील आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्सवरील @SantoshGaharwar या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत.

धक्कादायक (Shocking) घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''बिचारा वाचला''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''कारवाई केली पाहिजे''तर काहींनी त्या गाडी चालवणाऱ्याच व्यक्तीला चुकीचे ठरवले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT