Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पाकिस्तानी पोलिसांनी आपल्याच लष्कराला डिवचले, नेमकं काय घडलं? व्हायरल व्हिडिओने पाकिस्तानची नाचक्की

Viral video Pakistan: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आलेला आहे. ज्यामध्ये घडलेली घटना पाहून प्रत्येक भारतीय आश्चर्यात पडलेला आहे. नक्की काय घडले असेल ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Police vs Army clash Video: सोशल मीडियावर सध्या इंडिया पाकिस्तान यांच्यामधील यांच्यातील विविध वादांच्या घटना जोरदार व्हायरल होत आहेत. कधी पाकिस्तान सीमावाद, राजकीय टीका आणि क्रिकेटशी संबंधित वादविवाद शिवाय लष्ककी कारवाया धारित अनेक व्हिडिओ आणि पोस्ट्स चर्चेत आहेत. मात्र, सध्या व्हायरल यासंबंधित एक वेगळा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो चक्क पाकिस्तानमधीलच आहे. जो पाहिल्यानंतर भारतीय लोक आश्चर्यात पडलेले आहेत.

पाकिस्तानमध्ये लष्कर-पोलिस आमनेसामने!

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ खैबर पख्तुनख्वा प्रांतातील लकी मारवत येथील आहे. जिथे पाकिस्तानी लष्कर आणि पोलिस यांच्यात मोठा वाद झाला आहे. ज्यात स्थानिक पोलिसांनी पाक आर्मी अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ करत अपमानास्पद भाषा वापरली. या घटनेने पाकिस्तानमधील सुरक्षायंत्रणांमधील तणाव पुन्हा एकदा उघड केला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून तो एक्स प्लॅटफॉर्मवरील @AdityaRajKaul या अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ ३० एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत लाखों नागरिकांनी पाहिला आहे आणि त्यावर मोठ्या संख्येने प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे लोकांनी हा व्हिडिओ अनेक माध्यमांवरही शेअर केलेला आहे.

व्हिडिओ (Video) भारतातील अनेक नागरिकांनी पाहिला आहे आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये म्हटलं की,''देवा त्यांतच वाद आपल्याला काय पाहतील ते'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आधी स्वत:मधले वाद सोडवा मग भारताकडे पाहा'' अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया भारतीय लोकांनी दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT