Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पत्ता विचारला अन् राडा झाला? डिलिव्हरी देणाऱ्यानं ग्राहकाला चोपला, डोकं फोडलं

Bengaluru Viral News: सोशल मीडियावर सध्या एक विचित्र घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकजण संतापलेला आहे. नक्की काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Delivery Agent Fight Video: ऑनलाइन शॉपिंगने प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्य सोपे केले असले तरी अनेकदा डिलिव्हरी प्रक्रियेमध्ये येणाऱ्या त्रुटी मोठ्या वादाला कारणीभूत ठरक असतात. नुकताच असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका चुकीच्या पत्त्याच्या गोंधळावरून डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये चांगलाच राडा झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, आणि त्यावर नेटकऱ्यांच्याही संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

व्हायरल(Viral Video) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसते,डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये सुरुवातीस काही तरी बोलणं सुरु असतं. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु होतो. पाहता पाहता हा वाद इतका टोकाला जातो की,दोघांमध्ये हाणामारी सुरु होते. घराबाहेर असलेल्या दोन महिला दोघांचा वाद शांत करण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

ही संपूर्ण घटना बंगळूरमधील असल्याचे समोर आलेले आहे. घटना काही तासांतच देशभरात वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ इन्स्टाग्राम, ट्वीटर(एक्स) आणि फेसबूक अशा प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर शेअर होत असून सध्या एक्स प्लॅटफॉर्मवरील @Hatewatchkarnat या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड केला आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि घटना समजून घेतल्यानंतर अनेक प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आता असे प्रकार वाढत आहेत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''धक्कादायक(Shocking Video) प्रकार'' अशा प्रकारच्या संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT