Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कोल्हापुरकरांचा काही नेम नाही; बकरीला खांद्यावर घेऊन सामना बघितला

Kolhapur Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा कोल्हापुरमधील विविध व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकजण पोट धरुन हसू लागला आहे.

Tanvi Pol

Funny Incident Video: हो, हे प्रकरण भन्नाटचं आहे! "कोल्हापुरकरांचा काही नेम नाही" ही म्हण अक्षरशः खरी ठरवणारी घटना नुकतीच समोर आली. फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी एक चाहत्याने बकरीला थेट खांद्यावर घेऊन स्टेडियममध्ये प्रवेश केला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! आता या घटनेची चर्चा सगळीकडे सुरु आहे. सोशल मीडियावरही याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

घडलं तर भलत!

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त बुधवार पेठ असा होता. त्यावेळी कोल्हापुरात (Kolhapur)फुटबॉल स्पर्धेदरम्यान गॅलरीमध्ये प्रेक्षकाने बक्षीस द्यायचं म्हणून बकरी आणली, त्यामुळे या स्पर्धेचे संयोजक असलेल्या बालगोपाल तालीम मंडळावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. फुटबॉल स्पर्धेदरम्यान मैदानात हुल्लडबाजी, अनुचित प्रकार घडत असतात, त्यावर कारवाई होते. मात्र, आता थेट प्रेक्षक गॅलरीतच बकरी घेऊन आल्याने एकच गोंधळ उडाला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला फुटबॉलचा सुरु असलेला सामना दिसत आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक खेळाडू आणि तरुण आलेले आहेत. मात्र, या सर्वांच्या गोंधळात सर्वांचे लक्ष एका तरुणाकडे जाते. कारण, तरुणाने थेट सामन्या पाहण्याठी त्यांच्या खांद्यावर एक बकरी आणली असल्याचे पाहण्यासाठी मिळते. त्याच प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने सर्व मजेशीर प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे.

हा व्हिडिओ (Video) सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील saamtvnews या अकाउंटवर सध्या अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड करताच काही क्षणात अनेक शरातील लोकांनी पाहिला आणि त्यावर विविध प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,''व्हिडिओमध्ये काहीही पाहण्यासाठी मिळते'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''असंच पाहिजे जनावरांना कशाला त्रास देतात'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: फुटबॉल सामन्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजितदादांना भरसभेत ‘I Love You’ म्हणणारा कार्यकर्ता ढसाढसा रडला; म्हणाला, दादांना मेसेज पाठवला अन्...VIDEO

Shocking: हादरवणारं दृश्य, नवरा-बायकोचे मृतदेह बेडरूममध्ये, ३ मुलं...त्या भयाण रात्री घरात नेमकं काय घडलं?

Wedding Hair Style: लग्नसराईसाठी साडीवर या ५ सुंदर आणि ट्रेंडिंग हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

Evening Yoga Tips : योगा संध्याकाळी करावा की नाही?

Maharashtra Live News Update : अजित पवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत २ राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी माझ्याकडे आग्रह केला - अंकुश काकडे

SCROLL FOR NEXT