Mumbai Local Train Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Viral Video: लोकलमध्ये महिलांना अश्लील भाषेत शिव्या; संतप्त महिलांनी शिकवला धडा

Mumbai Local Viral News : सोशल मीडियावर सध्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण असे काय घडले आहे ते व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Mumbai Local Train: मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. परंतू, याच लोकलमध्ये बऱ्याचदा अनुचित वर्तनाचे प्रसंग घडताना दिसतात. नुकताच असाच एक प्रकार समोर आला. जिथे एका व्यक्तीने महिलांच्या बाजूला असलेल्या डब्ब्यातून एका पुरुष प्रवाशाने बाजूला असलेल्या महिलांवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्या महिलांनी मिळून त्या पुरुषाला चांगलाच धडा शिकवला आहे.

सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकलमधील या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे. व्हिडिओत (Video) तुम्हाला दिसते की, महिलांच्या डब्ब्यांच्या बाजूलाच एक डब्ब्यातून एक पुरुषाला पकडून ठेवले आहे. ज्याला महिलेने पकडले आहे त्यांने काही वेळापूर्वी त्या महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. पण या महिलांनी घाबरुन जाता, पुढील स्टेशन आणि पोलिस येईपर्यंत त्याला पकडून ठेवले आहे. महिलांच्या डब्ब्यातील एका महिला प्रवासाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

संपूर्ण गोरेगाव स्टेशन दरम्यान घडलेली समजते.मात्र, साम टीव्ही याची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील mumbaiguide या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे आणि फेसबुक आणि ट्वीटर यावरही शेअर करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखों लोकांनी हा व्हिडिओ पाहिला त्यावर लाईक्स आणि मोठ्या संख्येने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

लोकलमधील (Local Train) या घटनेनंतर सोशल मीडियावर महिलांच्या या कृतीचं भरभरून कौतुक होत आहे. अनेकांनी नेटकऱ्यांनी ही घटना शेअर करत महिलांना सलाम केला आहे. तर काहींनी लिहिलं की, '' महिलांनी जर अशी एकजूट प्रत्येकवेळी दाखवली गेली, तर कोणतीही महिला असुरक्षित राहणार नाही'' अशा प्रकारे कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: लोकल ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

श्रावणात बनवा अळूच्या पानांची कुरकुरीत वडी; एकदा खाल तर खातच राहाल

Cinnamon Water Benefits: सकाळची सुरुवात करा दालचिनीच्या पाण्याने; रिकाम्या पोटी प्यायल्यास शरीराला मिळतील हे ७ फायदे

Maharashtra News Live Update: धुळ्यात वाहन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग

Worli Fort : मुंबईत असूनही पर्यटकांच्या नजरेआड राहिला वरळीचा किल्ला, 'या' गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या आहात का?

SCROLL FOR NEXT