Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आजोबांचा रोमँटिक अदांज! आजींसाठी 'वसंतसेना' गाण्यातून केलं प्रेम व्यक्त!

Old Couple Video: सोशल मीडियावर सध्या एका जोडप्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात आजोबांनी आपल्या पत्नीसाठी गाणं गायलं आहे.व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येकाच्या मोठ्या पसंतील आला आहे.

Tanvi Pol

Grandfather Sings For Grandmother: प्रेमाशिवाय संपूर्ण जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं जात.मात्र त्यातही नवरा-बायकोचं नातं हे अनेक नात्यापेक्षा वेगळे असते.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवरा-बायको एकमेंकाना साथ देतात आणि संपूर्ण आयुष्य पार करतात.मात्र सध्याच्या जगात नवरा-बायकोच्या नात्यातील जिव्हाला,प्रेम,आपुलकी कमी झालेली पाहण्यास मिळत आहे,पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात नवरा-बायकोचं शेवटपर्यंत नातं कसं पाहिजे ते दिसून आलं आहे.

सोशल मीडियावर अनेकदा विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात बऱ्याचदा अनेक जोडप्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात मग ते कधी त्यांच्या भयंकर हाणामारीचे असतात तर कधी भांडणाचे असतात,मात्र सध्याचा व्हिडिओ एका वयोरुद्ध जोडप्यांचा व्हिडिओ व्हायरल (Viral)होत आहे. ज्यात एका आजोबांनी आपल्या बायकोसाठी गाणं गायलं आहे.जो चांगलाचा नेटकरी वर्गाच्या पसंतील आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक आजी आणि आजोबा दिसत आहे.मुख्य म्हणजे दोघांचा पोशाख अस्सल पारंपरिक आहे,ज्यात आजोबांनी पांढऱ्या रंगाचा पायजमा-शर्ट आणि आजींनी मस्त साडी नेसलेली आहे.काही वेळात आजोबा आजींना विचारतात 'गाणं म्हणू का मग? आजोबा म्हणतात मी तुझ्यावरचं गाणं म्हणतो'.मग आजोबा दिसली वसंतसेना हे गाणं गाण्यास सुरुवात करतात.सर्व व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

'rajyaloktantra' या सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ (Video)अपलोड केलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''आजोबांना आजीबाईमध्ये दिसली वसंतसेना गाण्यातून दर्शवले प्रेम!'असे कॅप्शन देण्यात आले असून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''एकदम अरुण सरनाईक'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेट केली आहे,''किती दिवसांनी हे गाणे ऐकायला मिळाले आजोबा आज्जी असाच आनंद तुमच्या जिवणात असो'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : आजी आणि आजोबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT