VIDEO Saam Tv
व्हायरल न्यूज

VIDEO: मराठमोळ्या थाटात लावणीची जादू; हलगीवर डान्स करणाऱ्या तरुणींचा VIDEO व्हायरल

Viral Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणीच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा डान्स पाहून प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहेत. तुम्हीही एकदा व्हिडिओ पाहाच.

Tanvi Pol

Viral Video: मराठी संस्कृती त्यात नृत्य यांची जादू पुन्हा एकदा सोशल मीडियावर अनुभवायला मिळत आहे. सध्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, ज्यामध्ये काही मराठमोळ्या मुलींनी लावणीच्या तालावर हलगीच्या ठोक्याला ताल धरत असा धमाकेदार डान्स केला आहे आहे. डान्स पाहून नेटकरी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले आहेत.

मराठमोळ्या सौंदर्याची जादू

या व्हायरल (Viral News) व्हिडिओमध्ये मुली पारंपरिक वेशभूषेत आहेत. ज्यात त्यांनी नऊवारी साडी आणि गजरा, नथ आणि पारंपरिक दागिन्यांसह सजलेल्या आहेत. दोघींचा हावभाव, नृत्य आणि चेहऱ्यावरचे हावभाव ही डान्सच्या सौंदर्याला साजेशीच आहे. विशेष म्हणजे, या तरुणींच्या डान्समध्ये केवळ नृत्य नसून, त्यामागे असलेली ऊर्जा, आत्मविश्वास आणि मराठी संस्कृतीचा अभिमानही दिसतो.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी विविध कमेंट दिलेल्या आहेत. त्यातील एक यूजर म्हणतो की,''मराठी संस्कृतीचा अभिमान वाटावा असा डान्स'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''एकदा पाहिलं की पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटेल असा डान्स'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया डान्स पाहून आलेल्या आहेत.

तरुणींचा डान्स(Dance Video) व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील archu_gavali844 आणि vruttimalkar या अकाउंटवर अपलोड केला आहे. आतापर्यंत डान्स व्हिडिओला असंख्य लाईक्स आणि लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय फेसबूक आणि ट्वीटर( एक्स) अशा अनेक माध्यमांवर व्हायरलही होत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Home Offer: Jio ची जबरदस्त ऑफर! ६० दिवस मोफत इंटरनेट, १००० टीव्ही चॅनेल आणि OTT अ‍ॅप्स फ्री

Manmad : नगर- मनमाड महामार्गावर अग्नितांडव, हार्वेस्टर वाहनाला भीषण आग |VIDEO

Maharashtra Live News Update: संघटीत गुन्हा निष्पन्न, बागूल टोळीवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू

Sonakshi Sinha: सर्वात जास्त काळ प्रेग्नेंसीचा वर्ल्ड रेकॉर्ड...; सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या अफवांवर दिली खास प्रतिक्रिया

Sperm quality decline: कोरोनानंतर पुरुषांच्या आरोग्यावर मोठा परिणाम; शुक्राणूंची गुणवत्ता घसरतेय, पुढील पिढीसाठी वाढतो धोका

SCROLL FOR NEXT