Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: दारु ढोसली अन् रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली! मुंबई लोकल रोखली; माहिम स्टेशनवर मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा

Mumbai Viral Video: सोशल मीडियावर दररोज मुंबई लोकलचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. अनेकदा काही व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण होतो, त्यातच सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच आहे.

Tanvi Pol

Mahim Station Viral Video: Viral News: मुंबईतील लोकल ट्रेन सेवा म्हणजे शहरातील नागरिकांची जीवनवाहिनी. मात्र, काही वेडसर गोष्टींमुळे या सेवेला मोठा अडथळा निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार माहिम रेल्वे स्थानकावर घडला, जिथे एका मद्यधुंद व्यक्तीने धिंगाणा घालत थेट रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. या सर्व प्रकारामुळे लोकल ट्रेन काही वेळासाठी ठप्प झाली आणि त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहनही करावा लागला.

रेल्वे सेवा ठप्प!

कामाच्या वेळी प्रवाशांची स्टेशनवर गर्दी त्याच वेळी माहिम स्थानकावर एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत प्लॅटफॉर्मवर आला आणि गोंधळ घालू लागला. त्यानंतर त्या व्यक्तीने लोकल ट्रेन आल्यावर रेल्वे(Mumbai Local) ट्रॅकवर उडी मारली. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा तो चक्क लोकलवर चढला. मात्र, ट्रेनच्या लोको पायलटने त्याला काठी मारुन खाली उतरण्यास सांगितले. मद्यधुंद अवस्थेत असलेला व्यक्ती त्यावर थांबला नाही तर तो ट्रॅकच्या मधोमध जाऊन धिंगाणा करु लागला आणि ट्रॅकवरच बसला. सर्व प्रकार स्टेशनवरील प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अशा व्यक्तींवर कारवाई करावी अशा प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. शिवाय व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अजून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''तात्या विंचू ह्याचा कोण लागतो'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पोलिसांनी चांगलच चोपल पाहिजे, म्हणजे झोपेतपण असं करणार नाही'' तर काहींनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

माहिम स्टेशनवरील हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाच्या ''chal_mumbai'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वी मुंबई लोकलमधील अतरंगी प्रकार असो वा रेल्वे स्टेशनमधील घटना कायमच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतात.

टीप: माहिम स्टेशनवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT