Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एक विवाहसोहळा असा पण! ब्लॅकआऊटमध्ये पार पडलं लग्न, अंधारातचं घेतले 7 फेरे| VIDEO

Jodhpur Viral Video: सोशल मीडियावर एका लग्नाची तुफान चर्चा होत आहे. हा विवाह सोहळा खास होण्यासाठी कारणही तसंच काहीस आहे. नेमके कारण काय ते समजण्यासाठी व्हायरल व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Wedding In Blackout: राजस्थानातील जोधपूर हे शहर ऐतिहासिक किल्ले, रंगीबेरंगी संस्कृती आणि आलिशान विवाहसोहळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, नुकताच पार पडलेला एक अनोखा विवाहसोहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण हा विवाह पार पडला तो पूर्णतः अंधारात आणि सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे.

गेल्या काही दिवसांपासू जगभरात भारत-पाकिस्तान(Pakistan) युद्धामुळे तणावाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ​ब्लॅकआउट करण्यास सांगितले होते. त्यानंतर अनेक शहरात वेळोवेळी ब्लॅकआउ होत आहे. त्यात जोधपुरमध्ये एक विवाह सोहळा सुर होता दरम्यान त्यावेळी सायरन वाजताच नवरदेवाने लग्नामध्ये सर्व लाईट्स बंद करुन संपूर्ण अंधार करुन सात फिरे घेतले.

सोशल मीडियावर व्हायरल

जोधपुरचा या अनोख्या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहुण्यांनी सोशल मीडियावरही शेअर केले. काही तासातच या पोस्ट्सना हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले. पाहत पाहता हा व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर ट्रेंडिंगला जाऊ लागला. तो व्हिडिओ प्रत्येकाला युट्युबवरील saamtv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ (Video) व्हायरल होताच नवरदेवाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही यूजर्संनी म्हटलं की,''हा विवाह सोहळा आधुनिक भारताच्या मानसिकतेचं आणि लवचिकतेचं प्रतीक आहे." तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''भारतातील लोकं थांबणार नाहीत'' तर अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकत.

टीप: हा लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT