Indian Railway Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Train Viral Video: वर्दीला सलाम! रेल्वे जवानांनी धक्का देत चक्क बंद ट्रेन केली सुरू; VIDEO पाहून चक्रावून जाल

Indian Railway Viral Video: या व्हिडीओत भारतीय रेल्वेचे जवान एका बंद पडलेल्या ट्रेनला धक्का मारताना दिसून येत आहे.

Satish Daud

Indian Railway Viral Video: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओच व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. रस्त्यात एखादी गाडी बंद पडली, की तिला धक्का मारत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. पण कधी बंद पडलेल्या ट्रेनला धक्का मारतानाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला आहेत का?

रेल्वे जवानांनी धक्का देत ट्रेन केली सुरू

सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भारतीय रेल्वेचे जवान एका बंद पडलेल्या ट्रेनला धक्का मारताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

भीषण पूरस्थिती असो वा, भीषण रेल्वे अपघात (Train Accident) भारतीय रेल्वे जवानांच्या शौर्याचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. रेल्वेचे हे जवान दिवसरात्र प्रवाशांच्या मदतीसाठी तत्पर असतात. सध्या सोशल मीडियावर भारतीय जवान बंद ट्रेनला धक्का देत सुरु करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) भारतीय रेल्वेचे जवान आणि काही रेल्वे कर्मचारी मिळून एका बंद पडलेल्या ट्रेनला धक्का देत आहेत. हे सर्वजण मिळून ट्रेनला एका दिशेने ढकलत असल्याचे दिसत आहे, थोड्याच वेळात हळूहळू पुढे जाऊ लागते. ट्रेन पुढे सरकताच सर्व रेल्वे कर्मचारी आनंदी होतात.

हा व्हिडिओ व्हायरल @syedrafi नावच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओला लाखो लोकांनी बघितला असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. जवानांच्या शौर्याचं नेटकरी कौतुक करीत आहेत. तर काही जणांनी या व्हिडीओवरून केंद्र सरकारवर टीका देखील केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT