Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अप्रतिम...! मुंबईच्या तरुणांची मरीन ड्राइव्हवर जबरदस्त लावणी, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Viral Video On Marine Drive: मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर लावणी सादर करणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्या उत्स्फूर्त नृत्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

Dhanshri Shintre

लावणी हा महाराष्ट्राचा पारंपरिक आणि लोकप्रिय लोकनृत्य प्रकार आहे, जो संगीत, नृत्य आणि गीत यांचा सुंदर संगम आहे. पारंपरिकरित्या महिलांनी सादर केलेल्या या नृत्यात आता पुरुषही मोठ्या उत्साहाने सहभाग घेताना दिसतात. घुंगरू बांधून, ढोलकीच्या तालावर सादर होणाऱ्या या नृत्यशैलीने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. सोशल मीडियावरही लावणीला मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक जण विविध गाण्यांवर नृत्य सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर दोन तरुण जोशात लावणी सादर करताना दिसत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त नृत्यशैलीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

मुंबईच्या मरीन ड्राइव्हवरील एका अनोख्या लावणी सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण 'मला पिरतीच्या झुल्यात झुलवा' या लोकप्रिय गाण्यावर अप्रतिम लावणी सादर करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. मरीन ड्राइव्हवर फिरायला आलेली लोकही कौतुकाने त्यांना पाहत होती. या अप्रतिम सादरीकरणामुळे नेटकऱ्यांनी त्यांची भरभरून प्रशंसा केली आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक नृत्यशैलीला मिळत असलेला हा नवा रंग पाहून अनेक जण आनंद व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर सध्या मरीन ड्राइव्हवरील एका अनोख्या लावणी सादरीकरणाचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. rajdancer2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, मला पिरतीच्या झुल्यात झुलवा ही लावणी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली होती. एक जुनी आठवण! कशी वाटली लावणी?

या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “आमची मुंबई”, तर दुसऱ्याने कौतुक करत म्हटले, “एक नंबर आहे, खूप छान!” आणखी एका चाहत्याने लिहिले, “दादा, मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात. एकच नंबर!” तर काहींनी आपल्या आठवणी शेअर करत म्हटले, “शाळेचे दिवस आठवले, मी शाळेत असताना हे नृत्य सादर केले होते.” या व्हिडीओवर हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव होत असून नेटकऱ्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT