व्हायरल न्यूज

Japan Video: तेरा वर्षापूर्वीही जपानमध्ये झाला होता विध्वंस; त्सुमानीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Japan Tsumani : १३ वर्षापूर्वीही जपानमध्ये विध्वंस झाला होता. त्यावेळचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुमानीचा आहे. या व्हिडिओ पाहून आपण अंदाज लावू शकतो, २०११ मध्ये आलेला विध्वंस किती मोठा होता.

Bharat Jadhav

Japan Tsumani video:

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ७.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला. शक्तिशाली भूकंपानंतर सुमारे १५५ वेळा जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दोन भूकंपांची तीव्रता ७.६ आणि ६ रिश्टर स्केल इतकी होती. ७.६ आणि ६ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे जपानच्या पश्चिम किनारपट्टी भागात मोठी हानी झाली. याच दरम्यान १३ वर्षापूर्वीही जपानमध्ये विध्वंस झाला होता. त्यावेळचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest News)

हा व्हिडिओ २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुमानीचा आहे. या व्हिडिओ पाहून आपण अंदाज लावू शकतो, २०११ मध्ये आलेला विध्वंस किती मोठा होता. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, समुद्राच्या लाटा किती उंच उसळत आहेत. उसळलेल्या सुमद्राच्या लाटा समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले रस्ते आणि वाहनांना वाहून घेऊन जात आहेत. २०११ मध्ये आलेल्या त्सुमानीमुळे जपानमधील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर मोठी वित्तहानी आणि जीवितहानी झाली होती.

समुद्रातील पाण्याचा प्रवाह जोरात वाहू लागतो. समुद्राच्या लाटा अचानक उंच उसळतात. समुद्रातील लाटा बोटींना समुद्राच्या बाहेर फेकून देतात. त्यानंतर उंच उसळलेल्या लाटा थेट समुद्राच्या सीमा ओलांडत रस्त्यांवरील वाहनांना वाहून नेतात. संपूर्ण शहरात पाणी शिरतं. आपला जीवन वाचवण्यासाठी लोकं सैरवैर धावताना दिसत आहेत. पॅसिफिक समुद्रात भूकंप आल्याने त्सुमानी आल्याचं सांगितलं जातं. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार १८ हजार नागरिकांचा मृत्यू या त्सुमानीमुळे आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसई-विरारमधील तलावांमध्ये पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमुळे आंदोलन

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

SCROLL FOR NEXT