Saam Tv
व्हायरल न्यूज

'नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने अन्...; घराच्या कपाटातील दृश्य पाहून सारेच हादरले, नेमकं काय पाहिलं?

Snake In Home: साप म्हटलं की प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडतो. सध्याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका सापाचा आहे. मात्र हा साप नक्की कुठे होता ते पाहिल्यानंतर तुमच्याही अंगाचा नक्कीच थरकार उडेल.

Tanvi Pol

साप म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यातच तो जर घराच्या अगदी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कपाटात सापडला, तर भीतीने थरकाप उडणे स्वाभाविकच आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे, जिथे घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये एक धूडधांड नाग आरामात बसलेला आढळून आला.

ही धक्कादायक घटना राजस्थानमधील एका शहरातील असून, संबंधित घरात सकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे साफसफाई सुरू होती. घरातील एक महिला कपाट साफ करत होती. कपाट उघडल्यानंतर तिने लॉकरचा दरवाजा उघडला आणि तिच्या थरकाप उडाला. लॉकरमध्ये एक मोठा नाग(Snake) गुंडाळून बसलेला होता. क्षणभर तिला काय करावे काहीच समजले नाही. तिने जोरात किंचाळत घरातील इतर सदस्यांना बोलावले.

सापाबद्दल कळताच घरातील सर्वजण बाहेर पळाले. लगेचच सर्पमित्रांना बोलावण्यात आले. काही वेळातच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण सावधगिरीने नागाला बाहेर काढले. सुमारे ५ फूट लांबीचा हा नाग असल्याचे समोर आले. तो कोणालाही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आला.

सध्या हा व्हिडिओ(Video इन्स्टाग्रामवरील zarahatke.news या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सापाचा भितीदायक व्हिडिओ पाहून अनेकांनी तर विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खुपच भयानक आहे ही घटना'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आता राव घरात पण भितीच आहे'' अशा असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विरोधी पक्षाला मोठा धक्का; माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

Face Care: क्लिन आणि सॉफ्ट स्किनसाठी पार्लर ट्रेटमेंटची काय गरज? घरीच हा फेसमास्क करेल सगळे पॉब्लेम दूर

नाशिक हादरलं! 'मजामस्ती'साठी पोलीस निरीक्षकाकडून गोळीबार?

Maharashtra News Live Update: वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

Mumbai Crime: ४ किलोमीटरच्या प्रवासासाठी २००० रुपये उकळले, मुंबई एअरपोर्टबाहेर टॅक्सी चालकाकडून प्रवाशाची फसवणूक

SCROLL FOR NEXT