Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मेट्रोत धिंगाणा, ४ जणांनी त्याला बेदम चोप दिला; कॉलर धरली, चापटा मारल्या... पाहा व्हिडीओ

Delhi Metro Video: सोशल मीडियावर पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर आपण कायम अनेक अतरंगी व्हिडिओ पाहत असतो. मग कधी दिल्ली मेट्रोतील हाणामारीचे व्हिडिओ असतील तर कधी मुंबईच्या लोकल ट्रेनमधील व्हायरल व्हिडिओ असतील, असे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. अशातच सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत दिल्ली मेट्रोमधील एक स्टेशन दिसून येत आहे. ज्या परिसराच अनेक प्रवाशी जमलेले आहेत. मात्र तुम्ही व्हिडिओत पाहिले तर दिसेल की, काही व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीला मारत आहे. मात्र नक्की काय झाले हे कळू शकले नाही. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की तिथे असलेले काही व्यक्ती मारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून घेऊन जाण्यास सांगत आहे. सर्व व्हिडिओ(Video) तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये व्हिडिओतील भांडण कशामुळे सुरु आहेत हे समजून येते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''ऑफिसचा राग लोक काढत आहेत'' तर अनेकांनी लिहिले आहे,'' योग्य तपास करा नंतर एखाद्याला मारा'' तर अनेकांनी लिहिले आहे की,''दिल्ली मेट्रोतील हे कायमच आहे'' असे लिहिले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT