Viral Accident Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: भयंकर अपघात! ट्रकने तरुणीला स्कूटीसकट चिरडले; पुढे जे घडलं ते... व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

Trending Accident Video: सिग्नल सुटतो आणि ट्रकच्या पुढे असणाऱ्या तरुणीला ट्रक चालक (Accident) चिरडतो...

Gangappa Pujari

Viral Accident Video: सोशल मीडियावर भीषण अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला दिसत असतात. एका छोट्याशा चुकीमुळे किती मोठा अनर्थ घडू शकते. हेच या व्हायरल व्हिडिओंमधून दिसत असते.

अनेकदा हे व्हिडिओ इतके भीषण असतात की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो. सध्या असाच एक भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीला ट्रकने तिच्या स्कूटीसोबत चिरडल्याचे दिसत आहे. (Viral Video News In Marathi)

वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सुचना वारंवार केल्या जातात. तरीही अनेक वाहनचालक या सुचनांकडे दुर्लक्ष करताना दिसत असतात. अशा चूकांमुळेच अनेकदा भीषण अपघात घडतात. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) ट्रकवाल्याने एका महिलेला तिच्या स्कूटीसह चिरडल्याचे दिसत आहे. सुदैवाने गाडीसह चिरडल्यानंतरही ती महिला सुखरूप आहे. या संपूर्ण प्रकारानंतर तरुणीला असा काही धक्का बसला की ती थेट रस्त्याच्या कडेला जाऊन बसते.

या व्हिडीओमध्ये एका ट्रकच्या पुढे स्कूटीवर एक तरुणी उभी आहे. यावेळी सिग्नल लागल्यामुळे सर्व वाहने रस्त्यावर उभी आहेत. दरम्यान सिग्नल सुटतो आणि ट्रकच्या पुढे असणाऱ्या तरुणीला ट्रक चालक (Accident) चिरडतो. ती तरुणी तिच्या स्कूटीसबोतच ट्रकखाली जाते. दैव बलवत्तर म्हणून कि काय ट्रकखाली येऊनही या तरुणीला काही होत नाही, हे व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.

मात्र या या संपूर्ण प्रकारानंतर तरुणीला असा काही धक्का बसला की ती थेट रस्त्याच्या कडेला जाऊन बसते. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT