Thane Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Thane Viral Video: ठाणे शहराला पावसाने झोडपलं; दुकानात, घरात शिरलं पाणी; VIDEO VIRAL

Thane Rain Viral Video: राज्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. घरात, दुकानात पाणी घुसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागक आहे.

Siddhi Hande

राज्यात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहेत. त्यामुळेच रेल्वेचा खोळंबा झाला आहे. रेल्वेसोबतच नागरिकांच्या घरातदेखील पाणी घुसले आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी घुसलं आहे. याचाच व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

ठाणे शहरात पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ठाण्यात खोपट, वंदना अशा अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेक दुकानदारांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. मुसळधार पाऊस पडल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानात पाणी घुसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अनेक दुकानात पाणी शिरल्याचे दिसत आहे तर अनेक ठिकाणी दुचाकी पडल्या आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

व्हिडिओत ठाण्यातील अनेक दुकाने आणि घरात पाणी घुसले आहे. सखल भागात जास्त प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच रस्त्यावर बाईकदेखील खाली पडलेल्या दिसत आहे. तसेच दुकानात पाणी घुसल्यामुळे दुकानातील अनेक गोष्टी भिजलेल्या दिसत आहे. दुकानदारांचे नुकसान झाले आहे. ठाण्यातील पावसाचा जोर वाढतच आहे. मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सामच्या बातमीचा इम्पॅक्ट: नीट पेपरफुटीनंतर त्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचे आदेश

Maharashtra News Live Update: आदिवासी बांधवाच्या जागेवर बेकायदेशीर घरकूल बांधकाम

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची घोषणा; कोण-कोणाला मिळालं तिकीट जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावरचे डाग आणि टॅन कमी करुन ग्लोईंग चेहरा पाहिजे? रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT