Stunt Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Stunt Viral Video : टवाळखोराची स्टंटची हौस सायकलस्वाराला महागात पडली; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Social Media Viral Video : व्हिडिओतील दृष्यांनुसार, स्टंट करणारी व्यक्ती एका वेगवान ऑटोरिक्षाला लटकताना दिसत आहे. रिक्षा वेगात जात असताना ही व्यक्ती इतर वाहनांना स्पर्श करताना दिसत आहे.

प्रविण वाकचौरे

Viral Stunt Video :

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी सध्याच्या युगात कोण काय करेल याचा नेम नाही. बरेच लोक व्हायरल होण्यासाठी खूप धोकादायक स्टंट करतात. ज्यामध्ये इतरांच्या जीवाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार दिल्लीतून समोर आला आहे.

एका टवाळखोराचा ऑटो रिक्षावर धोकादायक स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या टवाळखोराची स्टंट हौस एका सायकलस्वाराला महागात पडली आहे. स्टंटमॅनचा धक्का लागल्याने सायकलवरुन जाणारा व्यक्ती खाली पडून जखमी झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओतील दृष्यांनुसार, स्टंट करणारी व्यक्ती एका वेगवान ऑटोरिक्षाला लटकताना दिसत आहे. रिक्षा वेगात जात असताना ही व्यक्ती इतर वाहनांना स्पर्श करताना दिसत आहे. काही वेळाने स्टंट करणाऱ्या व्यक्तीचा एका सायकलस्वाराला धक्का लागतो.

वेगाने धक्का लागल्याने सायकलवरुन जाणारी व्यक्ती खाली पडते. बेसावध असताना वेगाने खाली पडल्याने ही व्यक्ती जखमी झाली आहे. दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजवर हा सगळा प्रकार घडला आहे.

रिक्षाच्या मागे असणाऱ्या बाईकस्वाराच्या हेल्मेटला असलेल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीला पकडून कडक शासन करण्याची मागणी आता सर्वांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT