Odisha SUV Accident CCTV Footage Saamtv
व्हायरल न्यूज

Odisha Accident Video: एक चूक अन् ७ जणांनी गमावला जीव! भरधाव स्कॉर्पिओच्या अपघाताची भयंकर दृष्य; VIDEO

Odisha SUV Accident CCTV Footage: ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात एका भरधाव स्कॉर्पिओ दोन दुचाकींसह एका रिक्षाला धडक दिली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

ODISHA Accident Viral CCTV Footage:

ओडीसामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात एका भरधाव स्कॉर्पिओ दोन दुचाकींसह एका रिक्षाला धडक दिली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. या भयंकर अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

भरधाव स्कॉर्पिओने दुचाकी अन् रिक्षाला दिली धडक...

याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (26 जानेवारी) ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात एसयुव्ही कार आणि दोन दुचाकी आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. एक भरधाव स्कॉर्पिओ ओव्हरटेक करण्यासाठी पुढे सरकली असता रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी समोरुन जोरदार धडक दिली.

याचवेळी एसयुव्ही कारची शेजारून जाणाऱ्या रिक्षालाही धडक बसली. या धडकेनंतर एसयूव्ही आणि ऑटो रिक्षा रस्त्यालगतच्या शेतात पडली. या अपघाता तिन्ही गाड्यांमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. ज्यांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चारजणांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

या भयंकर अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत, ज्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एसयूव्ही आणि ऑटो रिक्षा एकाच दिशेने येत असून विरुद्ध दिशेने एक ट्रॅक्टर येत होता. एसयूव्ही भरधाव वेगाने जात रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात एसयुव्हीला धडक दिली, ज्यामुळे एसयुव्ही चालकाचे निमंत्रण सुटले अन् गाडी रिक्षाला धडकली.

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत..

या दुर्दैवी घटनेनंतर ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची सरकारी मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री पटनायक यांनी जखमींवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT