Car Accident Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Accident Video: भयानक! कार गरकन फिरुन उलटली अन् चालक चेंडूसारखा हवेत.. थरारक अपघाताचा VIDEO

Car Accident Video: व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इतका भयंकर आहे की गाडीतून ड्रायव्हर थेट चेंडूप्रमाणे बाहेर फेकल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

Gangappa Pujari

Viral Accident Video:

सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. चालकाचा थोडासा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो हेच या व्हिडिओमधून दिसत असते. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक व्हिडिओ हे भयंकर अपघाताचे असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इतका भयंकर आहे की गाडीतून ड्रायव्हर थेट चेंडूप्रमाणे बाहेर फेकल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

कुवेत प्रांतातील एका बीचवरील हा अपघाताचा व्हिडिओ (Accident Video) एखाद्या रोहित शेट्टीच्या चित्रपटातील एक्शन सीन वाटावा, इतका धक्कादायक आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक चार चालक बीचच्या किनाऱ्यावरुन त्याची कार फिरवताना दिसत आहे. मात्र समुद्राचा प्रवाह आणि लाटांमुळे गाडी हळूहळू किनाऱ्यावरुन पाण्याच्या प्रवाहाकडे जाते.

अचानक चालकाचे गाडीवरी नियंत्रण सुटते अन् गाडी थेट पलटी होते. या जोरात अपघातानंतर ड्रायव्हर थेट चेंडूसारखा हवेत उडतो. सुदैवाने चालकाला गंभीर दुखापत झाली नाही मात्र त्याच्या पायाला लागल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला

Maharashtra News Live Update: बिबट्याच्या अवयवांची तस्करी, पुण्यातील संगमवाडीत वनविभागाचा सापळा

Maharashtra Weather : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला! राज्यात आजही मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

आंबा की केळं? आरोग्यासाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर?

Vastu Shastra: बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; पैसे पण जातील आणि आरोग्यावरही होईल वाईट परिणाम

SCROLL FOR NEXT