Viral Video: Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हद्दच झाली! भररस्त्यात तरुणांची स्टंटबाजी; धावत्या बससोबत केले स्केटिंग; VIDEO पाहून उडेल अंगाचा थरकाप

Shocking Viral Video: सध्या एका तरुणाचा मुंबईच्या रस्त्यावर केलेला स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेत होत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Skating Stunt In Mumbai Road: सोशल मीडियावर कायम अतरंगी व्हिडिओ पाहण्यास मिळतात. त्यातील जास्त तर व्हिडिओ सध्याच्या तरुणाचे असतात. मग कधी तरुणाचे कौतुक होत असते तर कधी काही व्हिडिओ पाहून तरुणांचा संताप होतो. सध्या सोशल मीडियावर काही तरुणांचा स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी धावत्या बससोबत स्केटिंग स्टंट केले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक अनेक वाहनांची येजा होत असलेला रस्ता दिसून येईल. या रस्त्यावर बस दिसत आहे या बसला पकडून एक तरुण आहे जो स्केटिंग करत आहे. भर रस्त्यात धोकादायक पद्धतीने तरुण स्केटिंग स्टंट करताना दिसत आहे. पुढे व्हिडिओत दिसेल की, स्केटिंग करणाऱ्या तरुणासोबत आणखी एक तरुण आहे जो धावत्या बसच्या पाठी लटकलेला आहे. काही वेळात बसच्या पाठी मागे असलेले तरुण धावत्या बसच्या अगदी बाजूला रस्त्यावर झोपून स्केंटिग स्टंट करत आहेत. जर चुकूनही तरुणाचा स्टंट चूकला असता तर तो धावत्या बसच्या चाकाखाली आला असता. सर्व धक्कादायक व्हिडिओ(Video) त्यांच्या सोबत असलेल्या एका तरुणाने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

सध्या स्केटिंग स्टंटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@jgm_skating_lover' या अकाउंटवर शेअर केलेला आहे. या अकाउंटवर याच तरुणाचे अनेक धोकादायक स्टंटचे व्हिडिओ आहेत. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,'' स्केटिंग स्टंट'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहून तब्बल १ लाखहून अधिक यूजर्संनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर मोठ्या संख्येने व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंर यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''तू असं खेळू नकोस, स्वतःला आणि तुझ्या कुटुंबाला पश्चाताप करायला भाग पाडू नकोस भाऊ'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''पोलिसांनी कारवाई करावी'' अशा कमेंट्स केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT