viral video canva
व्हायरल न्यूज

Viral Video: बाई काय हा मूर्खपणा...फेमस होण्यासाठी ब्रेडला चिखल लावून खाल्ला, व्हिडिओ बघून म्हणाल याsssक!

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ एका नागरिकाने फेमस होण्यासाठी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपण नेहमीच सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहत असतो. सोशल मीडिया हे एक असं साधण आहे जिथे आपले नेहमी मनोरंजन होत असते. याबरोबर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नागरिक फेमस होण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या किंवा नवीन गोष्टी शोधून काढत असतात. कधी लोक सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आगळे वेगळे कारनामे करत असतात.

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी नागरिक काय करतील याचा कधीच नेम नसतो. याबरोबर हे विचित्र व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांना व्ह्यूज, कमेंट्स देखील मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जाणून घेऊया त्या सोशल मीडिया व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलयं.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती एक बिग बॅास कंटेस्टंट आहे. या बिग बॅास कंटेस्ंटट व्यक्तीचे नाव पुनीत आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी पुनीत रस्त्यावर झोपून चिखल ब्रेडला लावून खात आहे. पुनीतचा हा मूर्खपणा यूजर्सना अजिबात आवडलेला नाहीये. त्याचा हा विचित्रपणा पाहून यूजर्सनी त्याला वेडे म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ यूजर्सना krishna_01_uk या अंकाउटवर पाहायला मिळेल. पुनीतच्या या व्हिडिओला २८,१२० लाईक्स आणि २,२७३ कमेंट्स आल्या आहेत. याबरोबर यूजर्सना हा व्हिडिओ अजिबात आवडलेला नसून त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजर्सने लिहिले आहे की, काय काय बघावं लागणार आहे तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, कसे कसे लोक असतात पृथ्वीवर.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT