Dombivali Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dombivali Shocking Video: बापरे! डोंबिवली स्टेशनवर सापाची एन्ट्री; प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची पळापळ सुरू; VIDEO

Snake spotted at Dombivli railway Stationt: सोशल मीडियावर सध्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जिथे रेल्वे स्थानकावर साप आढळून आलेला आहे. सर्व भितीदायक व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Snake Video Viral: डोंबिवली रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक गोंधळ उडाला. कारण होते की, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कचऱ्याच्या डब्याजवळ साप दिसून आला होता. गर्दीच्या वेळेत झालेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती.

प्रत्येक दिवसाप्रमाणेच सोमवारी रात्रीही डोंबिवली स्थानकावर चढ-उतर करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती. दरम्यान, तिथे असलेल्या एका प्रवाशाच्या लक्षात आलं की, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कचऱ्याच्या डब्याजवळ काहीतरी हालचाल होते. जरा नीट पाहिलं असता तो साप(Snake) असल्याचं लक्षात आलं आणि क्षणातच एकच गोंधळ उडाला.

साप दिसताच तिथे असलेल्या प्रत्येक प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही जण मागे हटले, तर काहींनी साप कुठे जातोय हे पाहण्यासाठी व्हिडिओ काढायला सुरुवात केली. सुरूवातीला जी घबराट पसरली होती, तीच नंतर कुतूहलात बदलली. कारण तो साप मोठा नव्हता, तर फक्त एक सापाचं पिल्लू होतं. त्यामुळे धोक्याचा धोका कमी वाटला, आणि बघ्यांची गर्दी जमू लागली.

सध्या सर्व प्रकार सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ(Video) पाहताच त्यावर असंख्य प्रतिक्रिया, लाईक्स आणि व्हिडिओला हजारो लाईक्स मिळालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT