Snake Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Snake Viral Video: रिस्क है तो इश्क है! प्री-वेडिंग शूटमध्ये सापाची एन्ट्री; नवरा नवरीचा उडाला थरकाप, VIDEO व्हायरल

Snake Entered in Pre Wedding Shoot: प्री-वेडिंग शूटसाठी सर्वात भन्नाट जागा असावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी बरेच जण निसर्गाच्या सानिध्यात फोटो शूट करायचं असं ठरवतात.

Ruchika Jadhav

Viral Video:

सध्या सर्वत्र प्री-वेडिंग शूटचं ट्रेंन्ड सुरू आहे. लग्न ठरल्यावर अनेक कपल प्री-वेडिंग शूट करतात. यासाठी कोण काय करेल आणि काय नाही याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर प्री-वेडिंग शूटचा एक खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी पोज देत असताना त्यांच्यासमोर चक्क एक साप आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्री-वेडिंग शूटसाठी सर्वात भन्नाट जागा असावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी बरेचजण निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करायचं असं ठरवतात. मग कोणी डोंगराळ जागेवर, गड किल्ल्यांवर किंवा नदी सारख्या ठिकणी फोटोशूट करतात. अशात या कपलने या पलिकडे जाऊन विचार केलाय. यांनी एका नदीकाठी फोटोशूट केलं आहे. मात्र सकाळी नाही तर रात्री. रात्रीच्या अंधारात हे दोघेही एकमेकांना मिठीत घेत मस्त पोज देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा आणि नवरी दोघेही सुंदर ड्रेस घालून रेडी झालेत. तसेच हे दोघीही नदीकाठी पाण्यात बसलेत. रॉमँटीक सीन क्रियेट करण्यासाठी फोटोग्राफरसह ४ ते ५ जणांची टीम देखील येथे उपस्थित आहे. यावेळी फोटोग्राफर कपल उभे असेल्या ठिकाणी स्मोक क्लाउड तयार करतात. यामुळे पाण्यात लपून बसलेला साप बाहेर येतो.

साप आल्याचं नवरदेवाला समजतं. आता जरा जरी हालचाल केली तर साप आपल्याला चावणार असंही त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे तो लांबून बाकिच्यांना खुणावतो. त्यावेळी साप थेट फोटोग्राफर जवळ येतो. तर नंतर हा साप नवरा नवरीच्या मध्ये जाऊन उभा राहतो. यावेळी दोघेही भरपूर घाबरतात. मात्र नंतर साप या दोघांनाही काही न करता तेथून दूर निघून जातो.

प्री-वेडिंग शूटमध्ये आलेल्या सापाचा हा किस्सा @parshu_kotame_photography150 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फोटोसाठी काहीपण अशी कमेंट यावर एकाने केलीये. तर आणखी एकाने रिस्क है तो इश्क है असंही कमेंटमध्ये लिहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

SCROLL FOR NEXT