Valentine Day Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: व्हॅलेंटाईन डे' निमित्त CA पाणीपुरीवाल्याची सिंगल तरुणांसाठी स्पेशल ऑफर...; पाहा भन्नाट व्हिडीओ

Valentine Day Viral Video:व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सिंगल असणाऱ्या तरुणांना फ्रीमध्ये पाणी पुरी खायला मिळणार आहे. सध्या या पाणीपुरी विक्रेत्याची जोरदार चर्चा होतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Valentine Day Golgappe Viral Offer

फेब्रुवारी महिना सुरु होऊन काहीचं दिवस झाले आहेत. फेब्रुवारी महिना हा खास तरुणांसाठी महत्वाचा असतो कारण फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो.या महिन्याच्या १४ तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र या दिवसाचा फायदा फक्त प्रेमीयुगुलांनाच होतो. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सिंगल असणाऱ्या तरुणांना फ्रीमध्ये पाणी पुरी खायला मिळणार आहे. सध्या या पाणीपुरी विक्रेत्याची जोरदार चर्चा होतेय.

व्हॅलेंटाईन डे जरी फेब्रुवारी महिन्यात असला तरी या दिवसाची चर्चा जानेवारीत सुरु होते. फेब्रुवारी महिन्याच्या आधीच सिंगल व्यक्तींकडून सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स शेअर करण्यात येतात. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने व्हॅलेंटाईन विकमध्ये अनेक कॉपी शॉपमध्ये तसेच अनेक रेस्टोरेंट विविध ऑफर दिलेल्या असतात. मात्र सिंगल तरुणांसाठी नागपूरमधला तरुण एक मस्त ऑफर घेऊन आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मुलगा पाणीपुरीची गोड ऑफर देताना दिसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की,एका तरुणाने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सीए पाणीपुरी तरुणाचा आहे. व्हिडिओत तरुण सांगतो की, व्हॅलेंटाईन डे खास सिंगल लोकांसाठी फ्रीमध्ये पाणीपुरीची ऑफर सुरू केली आहे तसेच तो ठिकाण आणि वेळही व्हिडिओत सांगतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत.

एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'तुम्ही खूप छान काम करत आहेत तसेत तु्म्हालाही एक सुंदर गर्लफ्रेंड मिळो' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'कोणी विचार केला आमच्या सिंगल लोकांचा' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,' तुच माझा भाऊ आहे पण मी पाणीपुरी खात नाही'अशा गंमतीदार प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.

सीए पाणीपुरीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील@nagpurfoodpediaया इन्स्टाअकाउंटवर पोस्ट शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ४० हजाराहून अधिकचे लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाच्या दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?

कोरोना लसीमुळे साईड इफेक्ट्स झाला? सरकारला द्यावा लागणार मोबदला; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Live News Update : कोल्हापूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद

New Rule : कार, दुचाकी ट्रान्सफरसाठी आता NOC ची गरज नाही, सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय, वाचा

Trending Blouse Designs: ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, कोणत्याही साडीत उठून दिसेल मागचा गळा

SCROLL FOR NEXT