Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! पाळणा घरातील १८ महिन्यांच्या चिमुकलीला डस्टबिनमध्ये टाकले अन् खेळण्यासारखे फिरवले; VIDEO पाहून प्रत्येकजण संतापले

Shocking Viral Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक धक्कादायक घटना पाहण्यासाठी मिळत असतात. नुकताच सध्या अशाच एका धक्कादायक घटनेने सर्वजण संतापले आहेत. नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Tamil Nadu Shocking Video: बालसंगोपनासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या डेकेअर सेंटरमध्ये लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात डेकेअरच्या कर्मचाऱ्यांनी निष्पाप चिमुकली सोबत क्रुर वर्तन केले आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हायरल होत असलेली घटना तमिळनाडूमधील आहे. ज्या व्हिडिओत तुम्हाला डेकेअर सेंटर दिसत आहे. ज्यात दोन महिला असून त्यांच्या हातात एक मोठा डसबिन आहे. जर तुम्ही डसबिनमध्ये पाहिले तर एक चिमुकली आहे. तिला त्या महिलांनी डसबिनमध्ये जबरदस्तीने बसवून जोरजोरात झोक्यासारखे फिरवत आहे. चिमुकली घाबरुन किंचाळत आहे तरीही त्या थांबताना दिसत नाही. सर्व प्रकार सध्या वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र व्हायरल होत आहे.

लहान मुलांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्नचिन्ह

घरातील आई आणि वडील नोकरीला जात असल्याने दिवसभर मुलांची काळजी घेण्यासाठी पाळणाघरे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, अशा काही पाळणा घरांमध्ये मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वारंवार समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून, सर्वच पाळणाघरांची सुरक्षा आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्हिडिओ पाहून संतापले नेटिझन्स

सध्या सर्व घटना सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेली असून त्याचा व्हिडिओही पाहण्यासाठी मिळत आहे. तो व्हिडिओ एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. डेकेअरचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक नेटकरी वर्गातून त्या महिलांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

टीप: धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाकडून उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

SCROLL FOR NEXT