Shocking  Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking : पेरू विक्रेत्याचा किळसवाणा कृत्य, थुंकी लावून पेरू विकताना दिसला; VIDEO झाला व्हायरल

Viral Video: बाजारात पेरू विक्रेत्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर थुंकी लावून पेरू विकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नागरिकांनी या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.

Manasvi Choudhary

बाजारातून फळे , भाजी विकत घेताना आपण ती ताजी आणि स्वच्छ घेतो. विक्रेत्याला देखील आपण ताजी भाजी द्या, असं सांगतो. मात्र सोशल मीडियावर एका फळ विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमचंही डोकं फिरणार आहे. तुम्हालाही मोठा धक्का बसणार आहे. एक फळ विक्रेता चक्क थुंकी लावून फळाची विक्री करताना समोर आला आहे.

सोशल मीडियावर सध्या एका फळविक्रेत्याच्या किळसवाण्या कृत्याने लक्ष वेधून घेतलं आहे. बाजारात रस्त्यालगत असणारा हा फळ विक्रेता थुंकी लावून पेरू विकताना दिसत आहे. प्रत्यक्षदर्शीनी या विक्रेत्याचा थुंकी लावून पेरू विकतानाचा व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओतून ग्राहकांना सावध केलं आहे.

सोशल मीडियावर या पेरू विक्रेत्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही देखील पाहू शकता, रस्त्यालगत दुचाकीवर पेरू विक्रेत्याचा स्टॉल आहे. नियमितपणे स्टॉल सुरू केल्यानंतर हा विक्रेता पेरू पुसून विकण्यासाठी रचताना दिसत आहे. मात्र व्हिडीओतून तुमच्याही लक्षात येत असेल विक्रेता हा पाण्याने नाही तर थुंकी कपडयाला लावून नंतर पेरू पुसत आहे.

पेरू विक्रेताचा हा प्रताप पाहून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसत आहे. थुंकी लावून जर हा विक्रेता पेरू विकत असेल तर ग्राहकांना याचा गंभीर त्रास होऊ शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. असंख्य नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Accident : सांगलीत भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाने ४-५ वाहनांना उडवलं, परिसरात खळबळ

लवकरच सीमा बदलणार, सिंध मिळणार; विना लढाईचं PoK येणार भारतात: संरक्षण मंत्री

प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

SCROLL FOR NEXT