Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रीलचे वेड तरुणाच्या अंगलट...! धबधब्यावर असताना पाय घसरला अन्; पुढे जे घडलं ते भयंकरच; पाहा VIDEO

Shocking Video: सोशल मिडियावर कायम धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या असाच एक तरुणाचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

Tanvi Pol

Viral Video News: गेल्या काही महिन्यात पर्यटनाच्या ठिकाणी अनेकांना जीव गमवावे लागले आहे. जीव गमावलेल्यापैंकी अनेकांनी धोकदायक ठिकाणी स्टंट करण्याच्या नादात जीव गमावला आहे तर अनेकांनी निष्काळजीपणामुळे. मात्र पर्यटनाकांना धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो आणि रिल्स काढणे आवडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका धोकादायक ठिकाणीच तरुणीला रिल्स काढणे अंगाशी आलेले आहे. नक्की काय घडलं व्हिडिओत ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक धबधबा दिसून येत आहे. या धबधब्यावरुन पाण्याचा जोरदार प्रवाह खाली कोसळत आहे. त्यात एक तरुण धबधब्याच्या एका दगडावर फोटो काढण्यासाठी येत असतो. मात्र पाण्याचा खाली कोसळणारा जोरदार प्रवाह आणि दगड घसरणारे झाल्याने तरुण ही त्या दगडावरुन घसरतो, मात्र नशीब चांगले होते म्हणून तरुण उंच अशा धबधब्यावरुन खाली कोसळता कोसळता बचावला जातो. सर्व व्हिडिओ तरुणाच्या मित्राने कॅमेऱ्यात त्याचा व्हिडिओ(Video) आणि फोटो काढत असताना कैद केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@de_boggio_media'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''नशिबवान व्यक्ती आहे'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला पोस्ट करत ४ दिवस झालेले आहे त्यानंतर आतापर्यंत व्हिडिओला हजोरांच्या संख्येने लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजवर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. मात्र सध्या तरुणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होताच बऱ्याच यूजर्संनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' भावा हळू'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' नशिबवान आहेस भावा'' तर काही नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT