Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking News: तुला आई म्हणावं का? रील्स तयार करताना चिमुकला आडवा आला, संतापलेल्या महिलेने लाथ मारली

Shocking Footage Video: सोशल मीडियावर जगभरातील घटना काही क्षणात व्हायरल होत असतात. त्यातील काही घटना इतक्या भयंकर असतात ज्या पाहून प्रत्येजण हैराण होऊन जातो. नक्की काय घडले पाहा.

Tanvi Pol

Viral Video News: सोशल मीडियाच्या क्रेझमुळे काहीजण कोणत्याही सीमा ओलांडायला तयार झाले आहेत. व्हायरल व्हिडिओ तसेच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काहीजण अमानुष कृत्येही करतात, जे पाहून माणुसकीही लाजून जाईल. सध्या अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. येथे एका महिलेने केवळ रील्स बनवताना अडथळा आणल्याच्या कारणावरून एका चिमुकल्याला निर्दयपणे लाथेने फेकले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हायरल (Viral)होत असलेल्या या घटनेत तुम्हाला एक खोलीत दोन महिला दिसून येत आहे. शिवाय खोलीत असलेल्या एका बेडवर लहानसा चिमुकला आहे जो रडताना दिसत आहे आणि त्या महिला रील्स व्हिडिओ काढण्यात व्यस्त दिसत आहे. चिमुकला रडत आहे त्याचेही भान त्यांना नाही. पुढे पाहिले तर महिला रील्स व्हिडिओ शूट करत असताना चिमुकला रडत रडत महिलेकडे येण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्यातील एक महिला त्या चिमुकल्याच्या पाठीत कोणताही विचार न करता जोरदार लाथ मारते. चिमुकला त्या बेडवर जाऊन आपटला जातो. परंतू त्या महिलेला जराही दया आली नाही. सध्या हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मात्र अनेक लोकांनी विविध प्रतिक्रिया करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आई आहेस की राक्षस'' तर दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''तिला हाणल पाहिजे'' अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

हा प्रकार नक्की कुठल्या शहरातील आहे हे अजून समजले नाही, मात्र सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@nexta_tv'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहून लोकांचा संताप येवढा अनावर झाला की अन्य मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ (Video)शेअर करत कारवाई करावी अशी मागणी नेटकरी वर्गातून होत आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University Protest: पुणे विद्यापीठात आंदोलन; पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड,VIDEO

Maharashtra Live News Update: आम्ही विरोधक आहोत म्हणून आम्हाला डावलण्यात येत आहे; वरूण सरदेसाई

Flight Ticket: सलग सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला, तिकीटासाठी दुप्पट खर्च; गोवा- चेन्नईसाठी किती पैसे मोजावे लागणार?

मुंबईत मराठी - गुजराती वाद, परप्रांतियाकडून मराठी तरूणाला मारहाण; VIDEO व्हायरल

Ahaan Panday-Aneet Padda: सैयारा नंतर अहान पांडे आणि अनित पड्डाच्या डेटिंगला सुरुवात? इंटरनेटवर रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT