Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्यावरुन सायकलने जाणाऱ्या वृद्धासोबत तरुणाचं संतापजनक कृत्य; व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या दोन तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात त्यांनी रिल्स काढण्यासाठी एका वयोरुध्द व्यक्तीसोबत धक्कादायक कृत केलं आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडिया कमी वेळात प्रसिद्ध होण्याचे माध्यम बनले आहे. गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर अनेकांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. मग सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण कोणत्याही थराला जातात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तरुणांचा व्हिडिओ पाहून या वाक्याचीच प्रचिती आलेली आहे. नक्की तरुणांनी काय केले ते तुम्ही खालील व्हायरल व्हिडिओत पाहा.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत दोन तरुण दिसून येत आहेत, जे एका दुचाकीवरुन जात आहे. दोन तरुणांपैंकी एक तरुण दुचाकी चालवत आहे तर दुसरा तरुण त्याच्या पाठीमागे बसलेला आहे. व्हिडिओत(Video) पुढे तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन एक वयोरुद्ध व्यक्ती सायकलवरुन जात असतात. मात्र त्यांच्या तोंडावर पांढरा स्प्रे मारतात आणि तेथून पळून जातात मात्र वयोरुद्ध व्यक्तीला यामध्ये कोणतीही इजा झालेली नाही मात्र यामध्ये त्यांच्या अपघात होण्याचीही शक्यता होती. संपूर्ण धक्कादायक (Shocking)प्रकार तरुणांनी त्यांच्या मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @priyarajputlive या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच नेटकऱ्यांच्या नजरेत आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच जवळपास लाखोच्या संख्येने तो पाहिला गेला आहे तर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

त्यातील एका यूजरने कमेंट्सबॉक्समध्ये लिहिले आहे की,''यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' यांना असे मिळून काय होते'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''अशा वागण्यामुळे अपघातही झाला असता'', शिवाय प्रत्येक नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT