Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चुक कोणाची? डिव्हायडर जवळ उभ्या असलेल्या महिलेला रिक्षा चालकानं उडवलं, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Pune Accident Video: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक भयानक अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातच पुन्हा एकदा पुणे शहरातून असाच एक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतोय.

Tanvi Pol

Road Accident Video: सोशल मीडियावर अनेक रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. बरेच अपघात वाहनचालकाच्या हलगर्जीपणामुळे होतात,तर काहींमध्ये दुसऱ्याची चूक कारणीभूत ठरते.त्यातच सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना आता घराबाहेर पडावे की नाही, असा प्रश्न पडतोय.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक रस्ता दिसत आहे. रस्त्यावर बऱ्यापैकी वाहनांची ये-जा दिसून येतेय.त्यातच रस्त्या क्रॉस करण्यासाठी एक महिला रस्त्यावर असलेल्या दुभाजकाच्या बाजूला थांबलेली दिसत आहे.त्यानंतर एक रीक्षा टर्न घेण्यासाठी तेथून येते आणि महिलेला न पाहता तिला जोरदार धडक मारते.तरुणीला रिक्षाचा धक्का लागून ती जमिनीवर जोरदार कोसळते.संपूर्ण व्हिडिओ एका प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैद झालाय.

संपूर्ण घडलेली घटना पुणे शहरातील असून तो व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामच्या ''ritam_marathi'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''पुण्यात घराबाहेर पडायचं की नाही?” रस्त्याच्या कडेला उभ्या महिलेला रिक्षाचालकानं उडवलं''असे लिहिले आहे.आतापर्यंत व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले असून हजारोंच्या घरात लाईक्स मिळत आहेत.

व्हिडिओ पाहून लोक भडकले!

अपघात (Accident)पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली,''भाई मी आत्ता पुण्यात आलो आहे रत्नागिरीमध्ये जाईन ना परत मी'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''आज काल रिक्षा वाले खूप मस्ती दाखवतात कशी पन रिक्षा पाळवतात यांच्या वर कारवाई झाली पाहिजे''तर तिसऱ्या यूजरने लिहिले,''सिग्नल सुटलेलं असताना तो मधेच आला ना चुकी कोणाची??''अशा अनेक प्रतिक्रिया तुम्ही पाहू शकता.

टीप: अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

SCROLL FOR NEXT