Pune Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune Video: खेळताना गमावला जीव! बाल्कनीतील फुलदाणी डोक्यावर पडून चिमुकला जागीच ठार; घटना सीसीटीव्हीत कैद

Shocking Pune Viral Video: सोशल मीडियावर सध्या पुणे शहरातील एका सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. घडलेली घटना पाहिल्यानंतर तुम्हीही हादरुन जाल. असे काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Pune Balcony Accident: पुणे शहरातील एका रहिवासी सोसायटीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. एका बाल्कनीतून फुलदाणी खाली पडून ती थेट खेळत असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्यावर आदळते, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहरातील कोथरूड परिसरात रविवारी दुपारी घडली आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हृदयद्रावक घटना कॅमेऱ्यात कैद

व्हायरल (Viral Video) होत असलेल्या घटनेत तुम्ही पाहू शकता, शाळांना सुट्ट्या लागल्याने अनेक लहान मुल सोसायटीमध्ये खेळत आहेत. लहान मुलांमध्ये अनेक नागरिक ये-जा करत असतात. प्रत्येकजण खेळण्यात मग्न आहेत. तेवढ्याच खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्यात जोरदार एक कुंडी कोसळते आणि मुलगा जागीच जमिनीवर कोसळतो. घटनेनंतर क्षणात तेथे असलेले नागरिक त्याच्या जवळ धावत जातात. मात्र, चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना जवळील सीसीटीव्हीत कैद झाली होती.

पुण्यातील ही घटना विविध सोशल माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आणि तो सध्या एक्सवरील @ManojSh28986262 या अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ पाहून हळहळला आहे तर काहींनी हा व्हिडिओ कुटुंबातील सदस्यांना तर काहींनी मित्र-परिवारामध्ये शेअर केलेला आहे.

सामाजिक प्रतिक्रिया

या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर (Media) नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''दैनंदिन जीवनात किती काळजी घेतली पाहिजे ते समजते'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''या घटनेनंतर अनेकजण आता सावधगिरी बाळगतील आणि बाल्कनीत रोपं लावताना योग्य ती खबरदारी घेतील'' तर काहींनी भावनिक अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

टीप: पुणे शहरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हार्दिक पांड्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल होणार

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत हायकोर्टानं दिला महत्वाचा आदेश, केंद्र सरकारलाही धाडली नोटीस

SCROLL FOR NEXT