Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्याचं काम, लोकांच्या जीवावर, बँकेनं त्यात भर घातली... व्हिडीओ पाहून तळ पायाची आग मस्तकात जाईल

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या दिल्लीमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकरी वर्गाने संताप व्यक्त केलेला आहे. नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Delhi Viral Video: राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही नागरिक एक अरुंद आणि अस्थिर असलेल्या मार्गावरुन जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग थेट धारदार असलेल्या लोखंडी सळईच्यावर टाकलेला दिसून येतोय, ज्यामुळे अत्यंत धोकादायर ठरत आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि बँकेत येणाऱ्या ग्राहकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

बँकेत जाण्यासाठी जीव धोक्यात टाकणारा प्रवास

या व्हिडिओत तुम्हाला एका सार्वजनिक ठिकाणी बॅंक दिसत आहे. बॅंकेच्या बाहेरील परिसरात रस्त्याची काम सुरु आहेत, मात्र बॅंकेत जाण्याचा मार्ग पुर्णपणे खोदला आहे आणि नागरिकांना बॅंकेत जाण्यासाठी तातपुरता एक मार्ग करुन दिला आहे. जो मार्ग पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण झाला असाल. त्या रस्त्याच्या खाली लोखंडी सळई आहे. त्याच मार्गावरुन नागरिक बॅंकेत जात आहेत. सर्व धक्कादायक(Shocking) प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे.

लोकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत असून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहे तर लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळालेले आहेत. व्हिडिओ पाहून अनेक नागरिक संतप्त झाले असून, अशा मार्गाची व्यवस्था करणाऱ्या प्रशासनावर टीका करत आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

''timestopica'' या अकाउंटवर व्हिडिओ(Video) अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहे. त्यातील काहींनी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे तर काहींनी हा प्रकार पाहून हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT