Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: स्कूटीवर आले, महिलेला अडवलं आणि सोनसाखळी हिसकावली; चोरीचा थरार व्हायरल

Shocking Theft Video: चोरीच्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या बरेच व्हायरल होत असतात. नुकताच एका व्हिडिओने सर्वजण थक्क झाले आहे. असे काय घडले असेल व्हिडिओत ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Chain Snatching Video: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यातच एका खळबळजनक प्रकाराची नोंद अलीकडेच उघडकीस आली आहे, जिथे भरदिवसा एका महिलेला लुटले गेले आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या ते फुटेज सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना नेमकी कशी घडली?

व्हायरल (Viral) होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये, पती-पत्नी स्कुटीवरुन जात असतात. दरम्यान दोन तरुण त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करतात आणि त्यातील एक व्यक्ती त्या महिलेच्या जवळ जातो आणि तिच्या गळ्यातील दागिने घेचतो. त्यातही तो महिलेचे केस जोरात ओढतो आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि तेथून तो पळ काढतो. या घटनेत ते दाम्पत्य गाडीवरुन जमिनीवर पडले जातात. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटने प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. शिवाय पोलिसांनी काही ठिकाणी झडती घेतली असून लवकरच या आरोपींना अटक केली जाईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सोनसाखळी चोरीच्या घटनेचा व्हिडिओ (Video) एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @SachinGuptaUP या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. शिवाय या घटनेतून सावध होण्यासाठी हा व्हिडिओ अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्यात 13 लाख 80 हजार किमतीचं ड्रग्ज'चं जप्त

Akshaya Yoga 2026: 19 एप्रिलला बनतोय सर्वात शुभ अक्षय योग; 4 राशींच्या व्यक्तींना लागणार लॉटरी

IAS Transfer: १२ दिवसात पुन्हा बदली; IAS जी श्रीकांत आता विभागीय आयुक्त

Buldhana : शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा, कॉलर पकडली अन् हाणामारी; संपर्क प्रमुखांसमोरच कांड, पाहा व्हिडिओ

खाकीवर डाग! ज्यानं १८० मुलींचं लैंगिक शोषण केलं, त्या अयान अहमदला पोलिसांनी भरवला केक; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT