Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ड्रायव्हर नाही, तरी कार रिव्हर्स, मायलेकी थोडक्यात बचावल्या, संभाजीनगरातील VIDEO व्हायरल

Accident Viral Video: सोशल मीडियावर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्या घडलेल्या घटनेत एक माय-लेक थोडक्यात बचावल्या गेल्या आहेत.

Tanvi Pol

Sambhajinagar Car News: संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे ड्रायव्हर नसलेली एक कार रिव्हर्स धावत थेट मेडिकल दुकानात घुसली.वाळुजमधील महाराणा प्रताप चौकातील हा थरार आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही,मात्र ३०० फूट रिव्हर्स कार बिना ड्रायव्हरची धावत सर्वजण घाबरून गेले होते.

नेमके घडले तरी काय?

कारचालक(Car driver)आपल्या पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी कार ही रस्त्यावर पार्क केली.मात्र, उताराने काही वेळाने कार आपोआप रिव्हर्स गेली आणि रस्ता ओलांडून ३०० फूट अंतरावरील मेडिकलवरील पायऱ्यावर चढली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र, मेडिकल काउंटरचे मोठे नुकसान झाले.

हा व्हिडिओ(Video) सोशल मीडिवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानंतर या घटनेवर लोकांनी आश्चर्य व्यक्त केलेले आहे.तर काही लोकांनी गाडीतील तांत्रिक बिघाड असल्याने ही घटना घडली असे म्हटलं आहे,तर काहींनी वाहन चालकाच्या निष्काळजीपणावर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे.

संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या युट्युवरील saamtv अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक लाईक्स केलेले आहे तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

टीप: संभाजीनगरमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

SCROLL FOR NEXT