Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: पायी चाललेल्या प्रवाशाला दुचाकीने उडवले,खेडमधील थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

Viral Video News: सोशल मीडियावर वारंवार अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. सध्या असाच एक थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. अपघात कुठे आणि कसा झाला ते एकदा पाहा.

Tanvi Pol

khed Shocking Accident: खेड तालुक्यातील दोंदे गावात एक भीषण अपघात घडला आहे. पायी चालत जाणाऱ्या एका प्रवाशाला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित प्रवासी गंभीर जखमी झाला असून, ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हिडिओ (VIDEO)तुम्ही पाहू शकता, अपघातात जखमी झालेला व्यक्ती रस्त्याच्या एका बाजून चालत येत असतो. दरम्यान त्या व्यक्तीच्या पाठीमागून एक दुचाकीस्वार वाहन चालवत येत असतो. पण तो येतो आणि रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून जोरदार धडक देतो. दुचाकीस्वार आणि तो व्यक्तीही जमिनीवर कोसळले जातात. तेवढ्यात परिसरातील नागरिक दोघांच्या मदतीसाठी धावून जाताना व्हिडिओत दिसत आहेत.

या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने नाव मारुती गुंडाळ असे असून अपघातात त्यांच्या मेंदूला जोरदार मार लागला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असून पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

खेडमधील या अपघाताचा(Accident) व्हिडिओ सध्या विविध सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. परंतू तो saamtv या युट्युब अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खूप भयानक झालं'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नक्की कोणाची चुक झाली ते समजलं नाही'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Maharashtra Live News Update: आमदार संग्राम जगताप यांना गोळी घालण्याची धमकी; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

Jalna Crime : मुलीच्या छेडखानीला विरोध करणाऱ्या पित्याला बेदम मारहाण; जालन्यातील धक्कादायक घटना

Vande Bharat Updates : आता वंदे भारतने अयोध्याला जा, २७ ऑगस्टपासून सुरू होणार एक्सप्रेस, वाचा रूट अन् तिकिट

SCROLL FOR NEXT