शांतता हवी असेल तर आपण अनेकदा नदीच्या किंवा तलावाच्या काठी जातो. मात्र कधी कधी त्याच पाण्यात असे काही प्रसंग घडतात जे तुमच्या अंगावर काटा आणतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये असाच एक प्रकार कॅमेरात कैद झाल्याचं दिसतंय. या व्हिडिओमध्ये एक स्पीड बोट वेगाने पुढे जाताना दिसतेय आणि तिच्या मागे मोठी मगर पाठलाग करत असल्याचं दिसतंय.
व्हिडिओमध्ये कॅमेरा बोटीच्या मागील दिशेला असल्यामुळे बोटीमुळे पाण्याचा प्रवास दिसून येतोय. काही क्षणांतच त्या लाटांमध्ये एक मोठी मगर दिसते आणि ती पूर्ण ताकदीने बोटीच्या दिशेने पोहत येते. तिचं डोका पाण्याबाहेर असून शरीर पाण्याच्या आत दिसून येतंय. बाजूला उडणारे पाणी आणि मगरीची हालचाल यामुळे हा व्हिडीओ काहीसा काळजाचा ठोका चुकवणारा वाटतो.
सामान्यतः मगर या सुस्त असतात, असं पण मानतो. मात्र या व्हिडिओने हा समज चुकीचा असल्याचं दिसतंय. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, मगर हे पाण्यात अत्यंत वेगाने पोहणारा जलचर प्राणी आहे. शिकार करताना मगरींचा वेग अधिक वाढतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पाण्यातील हालचालींमुळे किंवा आवाजामुळे मगर बोटीच्या दिशेने पोहू शकते.
हा व्हिडिओ फेसबुकवरील Wildman Adventures या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंटही केलीये. एका युजरने गमतीने म्हटलंय की, 'मगरीतही इंजिन बसवल्याप्रमाणे वाटतंय'.
तर दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, व्हिडिओ पाहून अंगावर शहारे आले. काही लोकांनी ही मगर हल्ला करण्यासाठी येत होती की फक्त बोटीच्या आवाजामुळे आकर्षित झाली होती याबाबत शंका व्यक्त केलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.