Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: जिवाची परवाच नाही! दुचाकीच्या हँडलवर पाय ठेऊन तरूणाचा हायवेवरून सुसाट प्रवास, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल

Bike Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्या व्हिडिओमध्ये एक तरुण अतिशय धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.पुढे नक्की काय घडते ते पाहा.

Tanvi Pol

Shocking Viral News: सोशल मीडियावर वारंवार अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतात.अशातच एका व्हिडिओने संपूर्ण नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.ज्यात उत्तर प्रदेशातील एका तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घालून बाईक चालवण्याचा स्टंट केलाय. हा स्टंट व्हिडिओ पाहून अनेक नागरिक हैराण झाले असून,यावर संतप्त प्रतिक्रियाही देत आहेत.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण महामार्गावर बाईक चालवताना दिसत आहे.विशेष म्हणजे, तरुण हातांचा वापर न करता हॅंडलवर पाय ठेवून बाईक चालवतोय.तरुणाचा हा स्टंट फक्त धोकादायक नाही तर पूर्णपणे जीवघेणाही आहे.तरुणाची बाईक चालवताना जराही चूक झाली असती,तर अतिशय मोठा अपघात घडू शकला असता.

व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच स्थानिक पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली असून,या तरुणाचा शोध सुरु केला आहे.अशा धोकादायक स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा पोलिसांनी दिला आहे.परंतु,असे काही लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे स्टंट करतात,ज्यामुळे अशा स्टंट्सना प्रोत्साहन मिळते.

सध्याचा स्टंट व्हिडिओ(Video) पाहून लोकांना नाराजी व्यक्त केली आहे.हा व्हिडिओ एक्सवरील ''WeUttarPradesh'' या पेजवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातीलच एका यूजरने कमेंट केली,''कडक कारवाई झाली पाहिजे''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''भिती कशी वाटत नाही'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मात्र या व्हिडिओची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT