Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: समोसा विक्रेत्याचे किळसवाणे कृत्य, रेल्वेमधील संतापजनक VIDEO; नेटकरी प्रचंड संतापले

Viral Video: गेल्या अनेक दिवसांपासून आपण खाद्य पदार्था संबंधित अनेक व्हिडिओ पाहत आलेलो आहोत. त्यात पुन्हा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

Tanvi Pol

Samosa Seller Viral Video: सोशल मीडियवर दररोज बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून आपल्याला प्रत्येकवेळी नवीन गोष्टी पाहण्यास मिळतात शिवाय त्यातून दोन गोष्टी शिकण्यासही मिळतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अतरंगी व्हिडिओ नाही तर खाद्य पदार्थांसंबंधित धक्कादायक व्हिडिओ पाहण्यास मिळत आहेत. आताही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका समोसा विक्रेत्याचा आहे. ज्या व्हायरल व्हिडिओत काय घडलं ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ एक ट्रेन दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओत(Video) पुढे पाहिले तर एक व्यक्ती ट्रेनमधील असलेल्या वॉशरुमच्या बाहेर उभा आहे. त्यात तो व्यक्ती वॉशरुमच्या बाहेर पडलेले समोशे उचलत असून त्यानंतर तो एका पिशवीत भरत आहे. मात्र चूकून खाली पडलेले समोशे भरत आहे का? प्रवाशाच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे ते नेमके समजून आलेले नाही. ट्रेनमधील सर्व प्रकार एका प्रवाशाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया इन्स्टाग्राम ''@nextstudy.in'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण ३ ऑक्टोबर रोजी पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''त्यामुळे बाहेरून काहीही खाऊ नये'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ पाहून मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर अजूनही असंख्य व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहेत.

इन्स्टाग्रामवर कायम अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र त्यामध्ये अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देत असतात. सध्याही अशात या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बिचारा पडले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' भगवान हा काय प्रकार'' तर अनेकांनी गोंधळात पडलेल्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT