Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रेल्वे प्लॅटफॉर्मवर धिंगाणा; पुरुषाची स्टेशनवरच सायकलवर स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एका रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क व्यक्तीने धोकादायक पद्धतीने स्टंट केलेला आहे. व्हिडिओ पुढे जे झाले ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Tanvi Pol

Railway Station Video: सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्यक्तीने सायकल चालवत विविध स्टंट केले आहे. भर गर्दीच्या वेळी स्टंट केल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक रेल्वे स्टेशन दिसून येत असून तिथे असलेल्या एका प्लॅटफॉर्मवर व्यक्ती येतो आणि प्रवाशांनी गर्दी असलेल्या प्लॅटफॉर्मवरच सायकल घेऊन येतो आणि सायकलच्या मदतीने स्टंट करण्यास सुरुवात करतो. अनेकदा वाटते की तो प्लॅटफॉर्मवरुन खाली पडले मात्र त्याने न पडता सायकलच्या मदतीने स्टंट(Stunt) केला आहे. स्टंट करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ तेथिल एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ''h_rossy_0046'' या अकाउंटवर तीन दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ७ हजारहून अधिन नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर अनेक व्ह्यूज मिळत आहेत. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक असे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

स्थानकावरील धक्कादायक स्टंट व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''आता काय बोलाव यांना'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कारवाई झाली पाहिजे'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''अशांमुळे अनेकदा अपघात होतात'', तर बऱ्याच नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT