Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे... वडील स्कूटीच्या पाठी अन् चिमुकलीच्या हाती गाडी; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा होतोय संताप

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल व्हायरल घटनेत तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला लहान मुलांचे अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. मग कधी शाळेतील मस्तीचे असतील मग कधी घरात घातलेल्या धिंगाण्याचे व्हिडिओ असतील. मात्र सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओ भररस्त्यात एका वडिलांनी चक्क चिमुकलीला स्कुटी चालवण्यास दिलेली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला रस्त्यावरुन प्रत्येक वाहनाची ये-जा होताना दिसून येते. मात्र यात एक स्कुटी दिसून येत आहे. ज्यात तुम्ही पाहिले तर चक्क एक चिमुकली स्कुटी चालवताना दिसत आहे आणि चिमुकलीचा वडील तिच्या पाठी बसलेला आहे. कोणतीही सेफ्टी न बाळगता त्या व्यक्तीने चिमुकलीला स्कुटी चालवण्यास दिली आहे. सर्व धक्कादायक (Shocking)प्रकार रस्त्यावरुन जाणाऱ्या एका प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील ''@aurangabadinsider'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे शिवाय व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक दृश्य'' असे लिहिण्यात आलेले आहे. ऐवढेच नाही तर अनेकांनी संतापजनक तर काहींनी सांगितले आहे की,'' वडील पाठी बसलेले आहे तर काळजी नका करु'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Government Apps: आता मोबाईलवर मिळणार सरकारी सेवा; फक्त एका क्लिकमध्ये, वाचा सविस्तर

Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

Actor Passes Away: पडद्यावरचा व्हिलन काळाच्या आड, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT