Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अति घाई, संकटात नेई! बायकोसोबत बाइकवरून विरुद्ध दिशेने प्रवास, स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल

Shocking Video : सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकून प्रवास केलेला आहे. व्हिडिओत एकदा पहाच.

Tanvi Pol

Pune Viral Video: ''पुणे तिथे काय उणे'' असं सहज म्हटलं जातं. पण याचा प्रत्यय तुम्हाला आजचा व्हायरल व्हिडिओ पाहून नक्की येईल. सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याचा रस्त्यावरुन प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क बाइकस्वारानं विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवर गाडी दामटली आहे. मात्र हा त्याचा स्टंट किंवा अतिघाई जीवावर बेतू शकला असता. त्याचा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकली असती. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओत तुम्हाला रस्त्यावरुन अनेक वाहनांची ये-जा होताना दिसत असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यवस्थितरित्या वाहन चालक वाहन चालवत आहेत. मात्र त्याच वेळी रस्त्याच्या उलट्या दिशेने जाणाऱ्या बाजूने एक व्यक्ती चक्क वाहन चालवत आहे. विशेष म्हणजे तो त्याच्या पाठी मागे एका महिलेला बसवलेले आहे. त्याच वेळी तिथे समोरुन वेगवान वाहन येत आहेत. मात्र त्यांना सावरुन तो बिनधास्त वाहन चालवत आहे. संपूर्ण थरार एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पुणे शहरातील हडपसर येथील सांगण्यात येत आहे,मात्र खात्री होऊ शकली नाही. व्हिडिओ शूट करुन एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@MihirkJha'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पोस्ट करण्यात येत आहे.

वाहन चालकाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गात तूफान चर्चेचा विषय ठरला आहे. एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''बायकोला माहेरी पाठवायचे होते त्याला'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''आपल्या कुटुंबाचा जीव कोण कसं धोक्यात घालू शकतो'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप :बाईक चालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र या व्हिडिओची.आम्ही फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Maharashtra Live News Update: आमदार उत्तम जानकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत तक्रार अर्ज

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT