Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भयंकर! एका अपघाताचे बचावकार्य सुरु, त्याचवेळी ब्रिजवरून दुसरी गाडी कोसळली, व्हिडिओ आला समोर

Shocking Accident Video: सोशल मीडियावर तुम्ही बऱ्याचदा विविध अपघातांचे व्हिडिओ पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा भयानक असा आहे. नेमके काय घडते ते पाहा.

Tanvi Pol

Rescue Operation Video: सोशल मीडियावर बऱ्याचदा अशा गोष्टी पाहण्यासाठी मिळतात, ज्या पाहिल्यानंतर प्रत्येकजण हादरुन जातो. सध्या असाच एक भयंकर व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात एका अपघातानंतर सुरु झालेल्या बचावकार्याच्या वेळीच घडलेल्या दुसऱ्या अपघात घडलेला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकरी हैराण झालेला आहे.

व्हिडिओत तुम्हाला,पुलाच्या खाली एक कार कोसळलेली दिसत आहे. वाहनात अडकलेल्या लोकांना काही नागरिक वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. हा अपघात इतका भयंकर असतो की परिसरातील नागरिक पुलाच्या खाली आणि वरही जमा झालेले आहेत. सर्व मदत कार्य सुरु असताना पुलावरुन एक वाहन चालक वाहना सकट खाली कोसळला जातो. सर्व थरारक(SHOCKING) अपघात एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झालेला आहे.

ही घटना नेमकी कुठली आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील umesh.deshmukh.779857 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था किती महत्त्वाची आहे, यावर पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे.

हा व्हिडिओ(VIDEO) व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही यूजर्संनी प्रत्येक नागरिकाला वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तर काही यूजर्संनी वाहनचालकांच्या बेफिकीरपणावर टीका केली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

SCROLL FOR NEXT