Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पुण्यात नेमकं चाललय काय? दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर दहशत; VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या पुणे शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दिवसा ढवळ्या बंदुकीच्या धाकावर दहशत दाखवण्यात येत आहे.

Tanvi Pol

Pune Viral Video: गेल्या काही वर्षात पुणे शहर हे गुन्हेगारींच्या घटनांमुळे ओळखले जाऊ लागले आहे. कधी कोणती गॅंग तर कधी दिवसाढवल्या खुन, अशा घटना दिवसेंदिवस पुणे शहरात घडत आहेत. त्यात सध्या पुन्हा एका घटनेने पुणे शहर हादरल आहे, ज्यात हातात बंदूक घेऊन गाडीवरुन इतरांना धमकावलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ पुणे शहरातील रस्ता दिसत आहे. या रस्त्यावर अनेक वाहने जात आहेत. अशातच याच रस्त्यावर दोन तरुण बाईकवरुन जात असतात. त्यातील एकजण बाईक चालवत आहे तर त्याच्या पाठी बसलेल्या तरुणाच्या हातात बंदुक दिसून येत आहे. जर व्हिडिओ नीट पाहिला तर दिसेल की ज्या तरुणाकडे बंदुक आहे तो रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बंदुकीच्या धाकावर दहशत दाखवत आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video) त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच दोघांचा तपास आता पोलिस करत आहेत. सध्या पुणे शहरातील व्हिडिओ युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@SAAMTV' या चॅनेलवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येकाच्या हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. शिवाय अनेकांनी या तरुणांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT