Shocking Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Viral Video: नागपुरात दुर्दैवी घटना! डोक्यावर फळी पडून वृद्धाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

Nagpur Accident Video: सोशल मीडियावर बऱ्याचदा अनेक धक्कादायक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्याचा व्हायरल व्हिडिओही असाच काहीसा आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही हादरुन जाल.

Tanvi Pol

Elderly Man Death: नागपुर शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यात एका वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून लाकडाची फळी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीत घडली असून संपूर्ण दुर्घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सीसीटीव्हीत कैद झालेला मृत्यू!

व्हिडिओत (Video) स्पष्टपणे तुम्हाला दिसून येईल,एक बांधकाम सुरु असलेली इमारत आहे. जिथे अनेक कामगार काम करण्यात व्यस्त असतात. दरम्यान एक वयोरुद्ध व्यक्ती बाहेर जाण्यासाठी या इमारतीमधून वाट काढत जात असतो. जसे ते इमारतीच्या बाहेर जात असतात, त्याच क्षणी इमारतीच्या उंचावर एक लाकडी फळ त्या व्यक्तीच्या डोक्यात पडते आणि जे जागीच कोसळले जातात.

वयोरुद्ध व्यक्तीला पाहिल्यानंतर एक कामगार धावत त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना उठवण्यातचा प्रयत्न करतो. पण डोक्यावर फळी पडल्याने जागीच त्यांचा मृत्यू होतो. सर्व ही घटना इमारतीच्या सीसीटीव्ही(CCTV) कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

नेमकी कोणाची चुक?

घडले असे की, इमारतीमध्ये काम करत असलेला मजूर सागर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून लाकडाच्या फळ्या खाली फेकत होता. त्यानंतर त्याने खाली न पाहताच बेजबाबदारपणे एक फळी खाली फेकली आणि ती फळी सुखदेव यांच्या डोक्यावर पडली. यामुळे त्यांचे डोके फुटले आणि ते गंभीर जखमी झाले.

त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुखदेव बळीराम आसवले असे मृताचे नाव आहे, तर सागर प्रेमचंद पाटील असे आरोपी मजुराचे नाव आहे. या प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी एका मजुरावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा नोंदवला आहे.

टीप: नागपूरमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT