नाविकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोघांचे प्राण; जनार्धन घाटावर कार गंगेत कोसळल्याची घटना Saam Tv
व्हायरल न्यूज

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Car Fell In River: पटणाजवळील जनार्धन घाटावर भीषण प्रकार घडला. ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबल्याने नवरा-बायकोची कार थेट गंगेत पडली. सुदैवाने जवळच असलेल्या नाविकाने दोघांची वेळीच सुटका केली.

Tanvi Pol

Patna News: पटणा बिहारच्या राजधानी पटण्यातील जनार्धन घाट परिसरात एक धक्कादायक घटना घडली. कारमध्ये बसलेल्या नवरा-बायकोने चुकून ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबल्यामुळे त्यांची कार थेट गंगेत कोसळली. हा सगळा प्रकार क्षणभरात घडल्याने आसपासच्या लोकांच्या डोळ्यांदेखत गाडी पाण्यात बुडत गेली. मात्र, सुदैवाने नदीतच जवळपास बोट चालवत असलेल्या एका तरुण नाविकाने प्रसंगावधान राखत दोघांनाही सुखरूपपणे बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

ही घटना जनार्धन घाटावर घडली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा-बायको आपल्या कारने जनार्धन घाटावर गंगेच्या दर्शनासाठी गेले होते. घाटाच्या काठावरच त्यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पार्किंग करताना चालकाने चुकून ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबल्याने कार वेगाने पुढे सरकली आणि थेट गंगेत कोसळली.

गाडी पाण्यात पडताच परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांमध्येच गाडीचा अर्धा भाग पाण्याखाली गेला. दोघंही गाडीच्या आत अडकले होते. दरम्यान, त्या परिसरात एका तरुण नाविकाची बोट चालू होती. त्याने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही वेळ न दवडता बोटीने गंगेत गाडीच्या दिशेने धाव घेतली.

सध्या या सर्व घटनेचा व्हिडिओ(Video) प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून अनेक नेटकरी वर्गातून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे,''खुपच भयानक घडत आहे सध्या'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''नशीब वाचले'' शिवाय अनेकांनी जीव वाचवणाऱ्या नाविकांचे कौतुक केले आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT