Drunk teacher seen dancing with girl students inside classroom; shocking video goes viral on social media Saam Tv
व्हायरल न्यूज

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Drunk Teacher Dance Video: छत्तीसगडमध्ये एका शिक्षकाने दारू पिऊन शाळेत हजेरी लावली आणि विद्यार्थिनींसोबत डान्स केला. हा संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Chhattisgarh Shocking Video: शिक्षकाला गुरू म्हटलं जातं. समाजात शिक्षकाचं स्थान अत्युच्च मानलं जातं. विद्यार्थ्यांचे घडवणारे, त्यांना चांगलं संस्कार देणारे शिक्षकच असतात. पण, छत्तीसगडमधून समोर आलेला एक संतापजनक प्रकार संपूर्ण समाजाला डोकं खाली घालायला लावणारा आहे. एका शिक्षकाने इतकं घृणास्पद वर्तन केलं आहे की, तो शिक्षक म्हणवून घ्यायलाही लाज वाटावी. तो शिक्षक दारूच्या नशेत थेट शाळेत हजर झाला आणि विद्यार्थिनींसोबतच डान्स करू लागला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

छत्तीसगडमधील एका शाळेमधील(School) ही घटना आहे. दररोजप्रमाणे विद्यार्थ्यांची उपस्थिती सुरू होती, वर्गात मुलंमुली उपस्थित होते. मात्र, या दिवशी शिक्षकाचा मूड काहीसा फिल्मी झाला होता. कारण, शिक्षक दारू पिऊनच शाळेत आला होता. त्याने वर्गात स्पीकर लावला आणि अचानक मोबाईलवर गाणी वाजवून विद्यार्थिनींना डान्स करण्यास सांगितलं.

शिक्षकाने मोबाईलवर एक फिल्मी गाणं सुरू केलं आणि मुलींना डान्स करण्यास सांगितलं. काही विद्यार्थिनी डान्स करत असतानाच, शिक्षक स्वतः त्या गाण्यावर ठुमके लावू लागला. नशेच्या अवस्थेत थिरकणारा शिक्षक हा संपूर्ण प्रकार दुसऱ्याच एका शिक्षकाने मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरतोय.

हा व्हिडिओ(Video) व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. एका बाजूला शिक्षकांच्या शिस्तीवर आणि जबाबदारीवर चर्चा होत असते, तर दुसऱ्या बाजूला असंख्य नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''कायमसाठीच नोकरीवरुन काढायला पाहिजे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT