snake in office saam tv
व्हायरल न्यूज

Snake In Office: तक्रार करून ६ तास उलटले, पण अधिकारी झोपलेलेच; वैतागलेल्या तक्रारदारानं ऑफिसमध्ये सोडला साप! -VIDEO

Snake In Viral Video: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक थक्क करणारी घटना समोर आली आहे

Ankush Dhavre

Snake In Office Viral Video: पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी भरतं त्यामुळे साप, विंचू आणि इतर प्राणी दिसणं मोठी गोष्ट नाही. पाण्यापासून वाचण्यासाठी हे प्राणी मिळेल तिथे जातात. अनेकदा घरांमध्ये साप निघण्याचा घटना पाहायला मिळत असतात.

मात्र तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका घरात साप घुसला होता, त्यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी न आल्याने संतापलेल्या व्यक्तीने थेट नगरपालिका कार्यालयात साप सोडल्याची घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भाजपचे युवा नेते विक्रम गौड यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, हैदराबादमधील अलवालमध्ये पावसादरम्यान एका व्यक्तीच्या घरात साप घुसला होता. त्यावेळी त्यांनी GHMC च्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि साप पकडण्याची विंनती केली. (Viral Snake Video)

वारंवार तक्रार करूनही ते साप पकडण्यास आले नाही. त्यावेळी त्यांनी साप पकडला आणि महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात सोडला.' तसेच त्यांनी पुढे असे लिहीले की, विचार करा ज्या व्यक्तीने हे पाऊल उचललं त्या व्यक्तीला किती वाईट वाटलं असेल.' (Latest News In Marathi)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या संतप्त व्यक्तीने अधिकाऱ्याच्या टेबलवर साप सोडला आहे. २६ जुलै रोजी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. तसेच नेटकरी देखील या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (Snake In Office)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT