Shocking Accident Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Nashik Video: भयंकर! कामाच्या शोधात निघाला अन् मृत्यूने कवटाळले,सिमेंट मिक्सरखाली येऊन तरुणाचा जागीच मृत्यू;Video व्हायरल

Shocking Accident Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ अपघात कसा घडला ते दिसून येत आहे.व्हिडिओ तुम्ही एकदा पाहा.

Tanvi Pol

Tragic Incident Video: नाशिकच्या सातपूर परिसरात एक भयानक अपघात झालेला आहे.घडलेल्या या अपघातात सिमेंट मिक्सर खाली चिरडला गेल्याने २२ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झालेला आहे.सध्या सोशल मीडियावर घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर वारंवार अनेक व्हिडिओ(Video) पाहण्यासाठी मिळत असतात.कधी रस्ते अपघाताचे तर कधी अक्षरशा:पोट धरुन हसायला लावणाऱ्या व्हिडिओचे.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका भयंकर अपघाताचा आहे.ज्यात एका तरुणाला रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

व्हायरल होत असलेली घटना नाशिक शहरातील सातपूर परिसरातील आहे.जिथे कामाच्या शोधात सातपूर परिसरातील एमआयडीसी येत असताना हा अपघात झाला.तरुण बाईकवरुन जात असताना पाठीमागच्या चाकात येऊन पडल्याने मृत्यू झालेला आहे.दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरात घडली होती अपघाताची घटना घटनेनंतर आज सीसीटीव्ही समोर आले आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 'saamtvnews' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''ओव्हरटेक च्या नादात''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''रोड फाटलेला दिसत आहे स्लिप झाली गाडी ह्याला दोषी कोण ठरवणार, नीट जाऊन या मधोमध रोड फाटलेला आहे त्यात गॅप असल्याने पुढचं चाक स्लिप झालं''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT